प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्यास वाढेल डिजिटल फसवणुकीचा धोका; भारती एअरटेलच्या उपाध्यक्षांचे ग्राहकांना पत्र
पार्सल डिलीव्हरीचे बनावट कॉल, फिशिंग लिंक्स आणि डिजिटल अरेस्ट सारख्या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांवर परिणाम होऊ नये आणि त्यांची सुरक्षा टिकून राहावी यासाठी एअरटेल कटिबद्ध असल्याचे भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सेफ सेकं अकाउंटची घोषणा देखील केली. हे अकाऊंट ग्राहकांच्या मुख्य बँक अकाऊंटपासून स्वतंत्र ठेवले जाते. सेफ सेकं अकाउंटमुळे डिजिटल पेमेंटसाठी वापरला येणारा पैसा सुरक्षित राहतो आणि कोणत्याही संभाव्य फसवणूकीपासून अतिरिक्त संरक्षण प्रदान केले जाते. ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले की, एअरटेल नेटवर्कमध्ये होणारे गुन्हे किंवा फसवणूकीच्या घटना अत्यंत चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांची सुरक्षा टिकून राहावी आणि त्यांना अशा घटनांना बळी पडावे लागू नये, यासाठी कायमस्वरुपी प्राधान्य राहील. एअरटेल कंपनी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून स्पॅम कॉल आणि मेसेजबाबत अलर्ट जारी करते. याशिवाय ग्राहकांनी चुकून एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक केले तर ती लिंक ब्लॉक करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. असे असले तरी देखील जर आपले प्राथमिक बँक अकाऊंट इतर पेमेंट एप्लिकेशनशी जोडल्यास आपल्या बचतीला धोका निर्माण हो शकतो. हेच धोके टाळण्यासाठी ग्राहकांसाठी सेफ सेकंड अकाऊंट हा सुरक्षित आणि अत्यंत सोपा उपाय आहे.
सेफ सेकंड अकाऊंटबद्दल माहिती देताना गोपाळ विठ्ठल यांनी सांगितलं की, मुख्यतः दैनंदिन डिजीटल पेमेंटसाठी सेफ सेकंड अकाऊंट तयार करण्यात आले आहे. या अकाऊंटमध्ये ग्राहक कमी रक्कम ठेऊ शकतात. या शिल्लक रकमेवर ग्राहकांना व्याजही दिले जाते. एअरटेल पेमेंटंस बँकेतून कर्ज किंवा क्रेडिट सुविधा देत नाही. त्यामुळे ग्राहकांना या अकाऊंटमध्ये मोठी रक्कम ठेवण्याची कोणतीही सक्ती नाही. ग्राहक हे अकाऊंट एअरटेल थॅँक्स एप्लिकेशनच्या मदतीने सुरु करू शकतात. यासाठी काही सोपी प्रोसेस आहे. ग्राहकांना एप्लिकेशनमधील पेमेंट बँक या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, आधार आणि पॅन आधारित केव्हायसी पूर्ण करावी लागणार आहे. एमपीन सेट करा, खात्यात थोडी रक्कम जमा करा. या प्रक्रियेनंतर तुम्ही व्यवहार सुरक्षितपणे सुरु करु शकता. ’’






