Samsung की iPhone? भारतात कोणत्या ब्रँडचा स्मार्टफोन सर्वाधिक विकला जातो? जाणून घ्या सविस्तर
भारतातील लोकांमध्ये स्मार्टफोनची वेगळीच क्रेझ आहे. खरं तर भारतीयांमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. शिवाय भारतीयांमध्ये सॅमसंग गॅलेक्सीची देखील प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे जेव्हा भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनचा विचार केला जातो, तेव्हा सॅमसंग आणि आयफोनचं नाव डोळ्यासमोर येतं. पण तुम्हाला जाणून ऐकूण आश्चर्य वाटेल की भारतात सर्वाधिक विकला जाणाऱ्या स्मार्टफोनचा ब्रँड आयफोन किंवा सॅमसंग नाही तर विवो आहे.
2024 च्या शेवटच्या तीन महिन्यांत विवोने आयफोन आणि सॅमसंगला मागे टाकतं बाजी मारली आहे. Vivo हा भारतातील बेस्ट सेलिंग फोन बनला आहे. सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, विवोने भारतात त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. साइबरमीडिया रिसर्चच्या रिपोर्टनुसार, Vivo भारताचा नंबर वन सेलिंग स्मार्टफोन बनला आहे. विवोने संपूर्ण भारतात त्यांच्या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री केली आहे. या स्मार्टफोनचा मार्केट शेयर 18 टक्के आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टफोनच्या यादीत दुसऱ्या स्थानावर Xiaomi चं नाव आहे. या स्मार्टफोनचा मार्केट शेअर 15.2 टक्के आहे आणि सॅमसंग या यादित तिसऱ्या स्थानावर आहे. सॅमसंगचा मार्केट शेअर 15.1 टक्के आहे. तर टेक जायंट कंपनी आणि सर्वांचा आवडता ब्रँड अॅपल या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या कंपनीचा मार्केट शेअर 11 टक्के आहे.
2024 मध्ये स्मार्टफोनच्या बाजारात एक अनोखा ट्रेंड पाहायला मिळाला. 2024 च्या शेवटच्या तीन महिन्यांत लोकं प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा लोकं महागडे स्मार्टफो खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देतात. एका सादर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी 50,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्मार्टफोनच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली. 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 5G स्मार्टफोनच्या विक्रीतही 80 टक्के पर्यंत प्रचंड वाढ झाली आहे.
गेल्या वर्षात सॅमसंगने देखील त्यांच्या स्मार्टफोनच्या ब्रँडची विक्री सर्वाधिक केली. मात्र त्यांच्या बजेट सेगमेंट फोनमध्ये म्हणजेच ज्या स्मार्टफोनची किंमत 7,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान होती, अशा स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये 7 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, भारतातील लोकं स्वस्त स्मार्टफोनच्या ऐवजी फीचर-पॅक प्रीमियम स्मार्टफोनची खरेदी करणं अधिक पसंत करतात.
सध्याच्या या डिजीटल आणि टच स्क्रिनच्या जगात लोकं Nokia, Lava आणि Jio सारख्या ब्रँड्सचे फीचर फोन कमी खरेदी करतात. 2G फीचर फोनची विक्री 22 टक्के आणि 4G फीचर फोनची विक्री 59 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. याचाच अर्थ सध्याच्या डिजीटल दुनियेत लोकं स्मार्टफोनकडे वळत आहेत. 25,000 रुपयांपेक्षा पुढील प्रीमियम सेगमेंटमध्ये Samsung सर्वात पुढे आहे. ज्याचा मार्केट शेअर 28 टक्के आहे. Apple कंपनी 25 टक्क्यांसह आणि विवो 15 टक्के शेअरसह या यादीत सहभागी झाला आहे. 5G स्मार्टफोन्सच्या विक्रीत विवोने बाजी मारली आहे.