Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास

Vivo Y600 Turbo Launched: तगडे फीचर्स आणि पावरफुल बॅटरीसह विवोने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे 32,000 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये IP68 + IP69 रेटिंगसारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2026 | 09:46 AM
Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास

Follow Us
Follow Us:
  • Vivo Y600 Turbo मध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह तब्बल 9000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर मिळतो.
  • Vivo च्या नव्या फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि IP68 + IP69 रेटिंगसारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने चीनमध्ये त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑफर करण्यात आले आहेत. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo Y600 Turbo या नावाने बाजारात लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला Y सीरीजमधील हा नवीन स्मार्टफोन 3 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये तगड्या कॅमेऱ्यासोबतच मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या

विवो वाय 600 टर्बो ची किंमत

नवा विवो वाय 600 टर्बो स्मार्टफोन 8GB + 256GB, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 40,000 रुपये आहे. हा नवीन स्मार्टफोन ड्यून गोल्ड, इलेक्ट्रिक ब्लू आणि मिलेनियम पिंक या रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाईस प्री-ऑर्डरसाठी चीनमध्ये उपलब्ध आहे आणि या डिव्हाईसची पहिली विक्री 27 मेपासून सुरु होणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

विवो वाय 600 टर्बो चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या विवो वाय 600 टर्बो च्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, नव्या फोनमध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची पीक ब्राइटनेस 5,000 निट्सपर्यंत आहे. या पॅनेलला एसजीएस लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आणि टीयूव्ही रिनलँड फ्लिकर-फ्री सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.

प्रोसेसर

फोनला पावर देण्यासाठी यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यासोबत अ‍ॅड्रेनो 810 जीपीयू, 12 जीबी पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी नव्या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जिथे f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरवाला 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला f/2.05 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष

बॅटरी

लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये कंपनीने 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9,000mAh बॅटरी दिली आहे. नव्या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Vivo ही चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे.

  • Que: Vivo चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, Vivo स्मार्टफोन कॅमेरा, डिझाइन आणि बॅटरी परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात.

  • Que: Vivo च्या फोनमध्ये कोणता कॅमेरा खास असतो?

    Ans: Vivo फोनमध्ये पोर्ट्रेट आणि नाईट फोटोग्राफीसाठी प्रगत AI कॅमेरा फीचर्स दिले जातात.

Web Title: Vivo y600 turbo launched in china with 9000mah battery and other amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
1

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
2

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
3

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच
4

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.