Snapdragon प्रोसेसरसह नव्या Vivo स्मार्टफोनची एंट्री... पावरफुल फीचर्स आणि आकर्षक डिझाईनने सुसज्ज; किंमत खिशाला परवडणारी
चीनमध्ये नवीन विवो स्मार्टफोन 6GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिअंटची किंमत CNY 1,599 म्हणजेच सुमारे 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन सध्या विवो चाईनाच्या ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लोइंग क्लाउड्स व्हाइट, सनसेट ब्लू आणि ट्वाइलाइट ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांत ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात. (फोटो सौजन्य – X)
डुअल सिम सपोर्ट असलेला Vivo Y6e 5G कंपनीच्या अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 सह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच एचडी+ (720×1,600 पिक्सेल) एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,200 निट्सची पीक ब्राइटनेस, 16.7 मिलियन कलर्स, 260 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 83 टक्के एनटीएससी कवरेज, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 90.4 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ ऑफर करतो. कंपनीने दावा केला आहे की, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग दिली आहे.
विवो Y सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन क्वालकॉमच्या 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटने सुसज्ज आहे. या प्रोसेसरमध्ये 1.95GHz क्लॉक स्पीडवाले सहा एफिशिएंसी कोर आणि 2.2GHz ची पीक क्लॉक स्पीड देणारे दोन परफॉर्मेंस कोर देण्यात आले आहेत. याशिवाय, लेटेस्ट लाँच विवो स्मार्टफोनमध्ये अॅड्रेनो 613 जीपीयू, 6GB की एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB चे यूएफएस 3.1 इंटरनल स्टोरेज दिले आहे.
फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा यासाठी, या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये f/2.2 अपर्चरवाला सिंगल 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे, जो 10x डिजिटल झूम आणि ऑटोफोकस सपोर्टसह येतो. यासोबतच, या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.2 अपर्चर आणि 2x डिजिटल झूमवाला 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या हँडसेटमध्ये 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात.
नव्या स्मार्टफोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. हा हँडसेट 5G, 4G एलटीई, डुअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाईप सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बेईडौ, क्यूझेडएसएस आणि गॅलिलिओला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये ग्रेविटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, ई-कंपास आणि IR ब्लास्टर सारखे ऑनबोर्ड सेंसर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.






