Recharge Plan: वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! Vi ने लाँच केला नवा प्लॅन; इंटरनेट डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे
Tech Tips: अचानक हँग होतोय स्मार्टफोन? ही असू शकतात कारणं… जाणून घ्या सविस्तर
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसह अनलिमिटेड डेटा आणि इतर फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. ज्यामुळे यूजर्स कोणत्याही टेंशनशिवाय मोबाईल इंटरनेटचा वापर करू शकतात. वोडाफोन आयडियाने त्यांचा नवीन रिचार्ज प्लॅन काही निवडक शहरांमध्ये लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत आणि यामध्ये कोणते फायदे ऑफर केले जाणार, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
वोडाफोन आयडियाच्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 4600 रुपये ठेवण्यात आली आहे. इतर खाजगी कंपन्यांच्या प्लॅन्सच्या तुलनेत ही किंमत फार जास्त आहे.
या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात कुठेही अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. याशिवाय यूजर्स मोफत नॅशनल रोमिंगचा देखील फायदा घेऊ शकतात. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना संपूर्ण एका वर्षाची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये रोज मोफत 100 एसएमएस देखील ऑफर केले जातात. इतकंच नाही तर यूजर्सना प्रत्येक 28 दिवसांसाठी 300GB डेटा दिला जाणार आहे. हा डेटा यूजर्स 4G किंवा 5G कोणत्याही नेटवर्कवर वापरू शकतात. मात्र कंपनी त्यांच्या सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी फायदे ऑफर करत नाही.
रिलायंस जियोच्या पोर्टफोलिओमधील सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 3999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. याशिवाय, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 2.5GB हाय स्पीड डेटाचा फायदा देखील मिळणार आहे. यूजर्स संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा वापरू शकतात. यासोबतच रोज मोफत 100 एसएमएसचा फायदा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये फॅनकोड, जिओटिव्ही आणि जिओ एआय क्लाउडसारखे फायदे देण्यात आले आहेत.
एअरटेलच्या पोर्टफोलिओमधील सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 3,999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यासोबतच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे मिळतात. एवढंच नाही तर या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2.5GB डेटा देखील मिळतो. कंपनी आपल्या प्लॅनसोबत वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देते. याव्यतिरिक्त, यामध्ये अडोबी एक्सप्रेस प्रीमियमचे 12 महिन्यांचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.






