जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसह व्हॉट्सऍप युजर्सची संख्या जास्त आहे. असे असताना सोशल मीडियापैकीचॅट बॅकअप एक असलेल्या व्हॉट्सऍप (WhatsApp) कंपनीकडून आपल्या युजर्संना विशेष काहीतरी देण्यावर भर असतो. त्यात आता व्हॉट्सऍपकडून नवं फीचर आणलं जातं.आता व्हॉट्सऍप एक नवं फिचर लॅांच करण्यात आलं आहे मात्र, यावेळी व्हॉट्सऍपन हे नव फिचर युझरची चिंता वाढवणारं आहे.
[read_also content=” https://www.navarashtra.com/crime/father-killed-son-giving-him-poisonous-powder-into-clod-drink-in-solapur-nrps-502901.html”]
व्हॉट्सॲप वापरणे थोडे महाग होणार आहे. व्हॉट्सॲप मोफत असले तरी आता यूजर्सला चॅट बॅकअपसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. पूर्वी ते मोफत होते. जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर तुम्हाला कळेल की प्रत्येक वापरकर्त्यासाठी चॅट बॅकअप खूप महत्त्वाचा आहे. सध्या, चॅट बॅकअप Google ड्राइव्हवर केला जातो, परंतु याचा वापरकर्त्याच्या Gmail वर त्याचा परिणाम होत नाही.
मात्र आता, कंपनीने अलीकडेच घोषणा केली आहे की आता व्हॉट्सॲप चॅट बॅकअप फक्त Gmail स्पेसमध्ये मोजले जातील. Google प्रत्येक Gmail वापरकर्त्यासाठी 15GB मोकळी जागा देते. या 15GB मोकळ्या जागेत तुमच्या सर्व ईमेल आणि Google Drive चे बॅकअप आहेत. जर तुम्ही Google Photos वर फोटो ठेवले असतील तर ते देखील या 15GB जागेत मोजले जातात. आता WhatsApp चा चॅट बॅकअप या 15GB मध्ये मोजणे सुरू होईल.
साधारणपणे, जे लोक व्हॉट्सॲपवर अधिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात त्यांच्यासाठी हे कठीण होईल. कारण व्हॉट्सॲप बॅकअपमुळे जीमेलची १५ जीबी जागा भरली जाईल.