Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. या फीचरअंतर्गत यूजर्सना व्हॉट्सॲपमध्ये थर्ड-पार्टी AI एजेंट्स आणि बॉट्सला थेट मेसेजिंग ॲपसोबत कनेक्ट करण्याची सुविधा मिळू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 05, 2026 | 12:58 PM
आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

Follow Us
Follow Us:
  • नव्या ‘एजेंट्स’ फीचरमुळे यूजर्सना व्हॉट्सॲपवरच थर्ड-पार्टी AI एजंट्स आणि बॉट्सशी चॅट करता येणार आहे.
  • यूजर्स प्रत्येक AI एजंटला स्वतंत्र नाव आणि प्रोफाइल फोटो देऊन एका अकाऊंटवर जास्तीत जास्त पाच एजंट्स जोडू शकतील.
  • थर्ड-पार्टी AI एजंट्ससोबतच्या संभाषणांना व्हॉट्सॲपचे पारंपरिक एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लागू होणार नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
WhatsApp New Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर एका नवीन फीचरची चाचणी सुरु आहे. या फीचरमध्ये यूजर्सना थर्ड-पार्टी AI एजेंट्स आणि बॉट्सला थेट मेसेजिंग ॲपसोबत कनेक्ट करण्याची सुविधा मिळू शकते. या फीचरअंतर्गत व्हॉट्सॲपवर जोडण्यात आलेल्या प्रत्येक एजेंटसाठी एक वेगळी चॅट विंडो मिळणार आहे. यामुळे यूजर्स ॲपमधून बाहेर न येता देखील विविध एआय चॅटबोट्ससोबत संवाद साधू शकणार आहेत. हे फीचर सध्या निवडक अँड्रॉईड यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. येत्या काही महिन्यात कंपनी सर्वच यूजर्ससाठी हे फीचर रोलआऊट करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सर्वांसाठी हे फीचर कधी रोलआऊट केलं जाणार, याची तारीख अद्याप जाहिर करण्यात आली नाही.

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

व्हॉट्सॲपमध्ये मिळणार 5 एजेंट्स सपोर्ट

व्हॉट्सॲप फीचर्स ट्रॅक करणारे प्लॅटफॉर्म WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे व्हॉट्सॲप फीचर बीटा फॉर अँड्रॉईड वर्जन 2.26.35.3 मध्ये पाहिले होते. रिपोर्टनुसार, ॲपच्या सेटिंगमध्ये एक नवीन एजेटंस पर्याय जोडला जाणार आहे, ज्यामुळे यूजर्सना सुसंगत सेवा जोडता आणि कॉन्फिगर करता येतील. यूजर्स प्रत्येक एजंटला स्वतःचे नाव आणि प्रोफाइल फोटो देऊ शकतील. व्हॉट्सॲप एका अकाऊंटसाठी जास्तीत जास्त 5 एजेंट्सना सपोर्ट करू शकतो.  (फोटो सौजन्य: istock) 

एपीआय की

एजेंट कॉन्फिगर केल्यानंतर व्हॉट्सॲप एक एपीआय की जनरेट करणार आहे. यानंतर यूजर्सना बॉट ज्या सेवेच्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेला आहे तिथे ही की पेस्ट करावी लागणार आहे. ज्यामुळे त्याला व्हॉट्सॲप चॅट्सशी लिंक केले जाऊ शकते. वेगवेगळ्या सेवांसाठी सेटअप प्रोसेस थोडी बदलू शकते आणि कनेक्शनव रिसेट करण्यासाठी नवीन की जनरेट करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. व्हॉट्सॲपसोबत लिंक झाल्यानंतर संबंधित एआय एजेंट त्याच्या वेगळ्या वैयक्तिक चॅट विंडोमध्ये काम करणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित थर्ड पार्टी सर्विसकडे यूजरचे दुसरे वैयक्तिक चॅट्स, कॉन्टॅक्ट्स किंवा मीडिया फाईल्सचा ॲक्सेस नसेल. याचा अर्थ असा आहे की, ग्रुप चॅट्स किंवा कम्युनिटीजमध्ये या एजेंट्सना जोडण्याचा पर्याय मिळणार नाही.

यूजर्स ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन जोडण्यात आलेले एजेंट्स कधीही मॅनेज करू शकणार आहेत, ज्यामध्ये त्यांचे नाव आणि प्रोफाईल फोटो बदलणं समाविष्य आहे. जर यूजरने एखाद्या एजेंटला हटवण्याचा निर्णय घेतला तर तो चॅटमधून डिस्कनेक्ट होणार आहे. मात्र व्हॉट्सॲप जुना चॅट इतिहास सुरक्षित ठेवणार आहे. यूजर्सची इच्छा असल्यास ते नवीन एपीआय की वापरून ती सर्विस पुन्हा रिकनेक्ट करू शकणार आहेत.

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!

यूजर्ससाठी महत्त्वाची अपडेट

रिपोर्ट्सनुसार, थर्ड-पार्टी AI एजेंट्ससोबत केले जाणारे संभाषण व्हॉट्सॲपच्या ट्रेडिशनल एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2EE) अंतर्गत येणार नाही. एजंटला पाठवलेले मेसेज मेटाच्या सेवेद्वारे एजेंट डेव्हलपरपर्यंत पोहोचतील, ज्यामुळे डेव्हलपरला त्यांच्या सेवेचा भाग म्हणून त्यांवर प्रक्रिया करणे शक्य होईल. तथापी, दोन यूजर्समध्ये केले जाणारे पर्सनल चॅट्स आणि कॉल्स पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात.

Web Title: Whatsapp ai agents feature users may soon connect third party ai bots directly in chats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
1

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
2

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
3

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर
4

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.