WhatsApp चे Username बनले चिंतेचे कारण! सरकारच्या बंदीनंतर कंपनीने अखेर दिले सर्व प्रश्नांचे उत्तर (Photo Credit- X)
या सुविधेच्या घोषणेनंतर अनेक युजर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता की, व्हॉट्सॲप वापरण्यासाठी युजरनेम तयार करणे बंधनकारक आहे का? यावर कंपनीने स्पष्ट केले आहे की, हे फिचर पूर्णपणे ऐच्छिक (Optional) असेल. ज्या वापरकर्त्यांना स्वतःचे युजरनेम तयार करायचे नाही, ते सध्याच्या पद्धतीनुसारच केवळ त्यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून व्हॉट्सॲप सुरक्षितपणे वापरू शकतात.
Username reservations are here, as more and more people claim theirs, here’s answers to the top questions you’re asking ⬇️ Q: Are usernames mandatory? A: Nope, they are optional. Q: What if the username I want isn’t available? A: There’s a few reasons you might not be able to… — WhatsApp (@WhatsApp) July 1, 2026
गोपनीयतेची काळजी घेताना व्हॉट्सॲपने स्पष्ट केले आहे की, हे युजरनेम सार्वजनिकरित्या शोधण्यायोग्य नसतील. याचा अर्थ असा की, केवळ तुमचे युजरनेम टाईप करून कोणताही अनोळखी व्यक्ती तुम्हाला शोधू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून एखाद्या व्यक्तीसोबत तुमचे युजरनेम शेअर करत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याशी संभाषण सुरू करू शकणार नाही. यामुळे युजर्सना नको असलेले संदेश मिळण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येईल.
Tech News: १०० स्पीड लेव्हल असलेला हँडहेल्ड फॅन लॉंच! प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परफेक्ट गॅझेट
वापरकर्त्यांची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी कंपनीने युजरनेमसाठी एक ‘सुरक्षा की’ (Security Key) देखील सादर केली आहे. जरी एखाद्या अज्ञात व्यक्तीला तुमचे युजरनेम मिळाले, तरीही तुमच्याशी चॅट सुरू करण्यासाठी त्याला या सुरक्षा कीची आवश्यकता भासेल. विशेष म्हणजे, वापरकर्ते ही की कधीही बदलू किंवा रीसेट (Reset) करू शकतात, ज्यामुळे संशयास्पद व्यक्तींचा ॲक्सेस त्वरित रोखता येईल.
माहिती तंत्रज्ञान (IT) मंत्रालयाने मूळ कंपनी ‘मेटा’ला (Meta) नोटीस बजावून या सुविधेचे वितरण (Rollout) तात्पुरते थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारचे असे मत आहे की, सायबर गुन्हेगार या सुविधेचा गैरवापर करून सरकारी अधिकारी, बँक कर्मचारी किंवा इतर विश्वासार्ह व्यक्तींचे बनावट प्रोफाईल तयार करून लोकांची फसवणूक करू शकतात. सध्या देशात वाढणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धोका अधिक गंभीर बनू शकतो, अशी भीती सरकारने व्यक्त केली आहे.
शासकीय चिंतेवर उत्तर देताना व्हॉट्सॲपने सांगितले की, जेव्हा एखाद्या वापरकर्त्याला पहिल्यांदाच अनोळखी युजरनेमकडून संदेश मिळेल, तेव्हा त्याच्या स्क्रीनवर एक ‘सुरक्षा अलर्ट’ (Safety Alert) फ्लॅश होईल. या अलर्टमध्ये संदेश पाठवणाऱ्याचा देश आणि त्यांच्या खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती दर्शविली जाईल. तसेच, संदेश पाठवणाऱ्याला ब्लॉक आणि रिपोर्ट (Block & Report) करण्याचे पर्याय त्वरित स्क्रीनवर उपलब्ध असतील. कंपनीच्या नियोजनानुसार, हे वैशिष्ट्य या वर्षाच्या अखेरीस सर्व वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जाईल.
आनंदाची बातमी! स्वदेशी AI क्लाऊडला मिळाली नवी दिशा; ESDS ने लॉन्च केले ‘स्वराज क्लाऊड’






