Xiaomi 17 vs iPhone 17: डिस्प्ले, कॅमेरा आणि फीचर्स... यूजर्ससाठी कोणतं डिव्हाईस ठरणार योग्य? वाचा संपूर्ण तुलना
आयफोन 17 आणि शाओमी 17 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच स्क्रीन दिली आहे. मात्र यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले आहे. शाओमी 17 मध्ये एलटीपीओ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 3500 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. ऊन्हात देखील यूजर्स स्क्रीन स्पष्टपणे पाहू शततात. आयफोनमध्ये 17 मध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे, जो 3000 निट्स ब्राइटनेस ऑफर करतो. दोन्ही स्मार्टफोन डॉल्बी व्हिजन सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशियोमध्ये शाओमीने बाजी मारली आहे. ज्यामुळे फोनला जास्त इमर्सिव लुक मिळतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
शाओमी 17 मध्ये 6330mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. तर आयफोन 17मध्ये 3692mAh बॅटरी आहे. शाओमी स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो. व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि गेमिंगसाठी हा स्मार्टफोन एक योग्य पर्याय बनतो.
Xiaomi 17 मध्ये नवीन स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो हाय-एंड परफॉर्मंस आणि मल्टीटास्किंगसाठी डिझाईन करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि UFS 4.1 स्टोरेजसह उपलब्ध आहे. ज्यामुळे यूजर्सना अतिशय स्मूद परफॉर्मंस ऑफर केला जातो. दुसरीकडे, आयफोन 17 मध्ये अॅपलचा A19 चिपसेट देण्यात आला आहे, जे चांगल्या कार्यक्षमता आणि सॉफ्टवेअर एकत्रीकरणासाठी ओळखले जाते. आयफोन आयओएस 26 वर चालते तर शाओमी स्मार्टफोन अँड्रॉईड 16 आधारित HyperOS 3 वर चालतो.
फोटोग्राफीच्या बाबतीत शाओमी 17 जास्त हार्डवेयर-फोकस्ड आहे. शाओमी 17 मध्ये 50MP प्राइमरी सेंसर (OIS), 50MP टेलीफोटो (2.6x झूम) आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. ही कॅमेरा सिस्टिम Leica ट्यूनिंगने सुसज्ज आहे आणि 8K व्हिडीओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करते. आयफोन 17 मध्ये डुअल 48MP कॅमेरा सेटअप दिला आहे. अॅपलची ताकद त्याच्या कंप्यूटेशनल फोटोग्राफी आणि डॉल्बी व्हिजन एचडीआर व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ आउटपुट खूपच संतुलित आणि नैसर्गिक दिसते.
iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी
शाओमी 17 च्या 256GB व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये आहे. तर आयफोन 17 च्या 256GB व्हेरिअंटची किंमत 82,900 रुपये आहे.






