अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त
Xiaomi 17 Ultra स्मार्टफोनच्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. शिवाय, कंपनी SBI क्रेडिट कार्ड वापरून या फोनवर 10 हजार रुपयांपर्यंत बँक सूट देत आहे. हा फोन 13 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य – X)
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच शाओमी हायपरआरजीबी ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 3,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, DCI-P3 कलर गॅमट, HDR+ सपोर्ट आण डॉल्बी व्हिजन देखील मिळणार आहे.
या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चिपसेट दिला आहे. ज्यामध्ये दोन परफॉर्मंस कोर आहे, जो 4.6GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. तर यामध्ये सहा एफिशिएंसी कोर देण्यात आले आहे. एवढेच नाही तर या फोनमध्ये 16 जीबी एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512 जीबी यूएफएस 4.1 स्टोरेज मिळत आहे.
फोटोग्राफीसाठी Xiaomi 17 Ultra मध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.67) चा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच या फोनमध्ये 1-इंच लाइट फ्यूजन 1050L सेंसर देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आणि 23mm इक्विवेलेंट फोकल लेंथ देखील समाविष्ट आहे.
Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
यासोबतच Xiaomi च्या या स्मार्टफोनमध्ये 1/1.4-इंच सॅमसंग HPE सेंसर, OIS, f/2.39 ते f/2.96 अपर्चर आणि 120x पर्यंत डिजिटल झूम कॅपेबिलिटीवाला 200-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 1/2.75-इंच सॅमसंग JN5 सेंसरवाला 50-मेगापिक्सेल (f/2.2) अल्ट्रावाइड लेंस देखील समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.2) कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये 1/2.87-इंच OV50M सेंसर आणि 90-डिग्री फील्ड ऑफ व्यू मिळणार आहे. तुम्ही फोनच्या मागील कॅमेऱ्यातून 8K/30 fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.
याशिवाय कंपनीने त्यांच्या या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरीसह 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.






