YouTube यूजर्ससाठी खुशखबर! कंपनीने वाढवला Premium प्लॅनच्या फ्री ट्रायलचा कालावधी, ऑफर क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
युट्युब त्यांच्या सबस्क्रीप्शन प्लॅनचे ट्रायल युजर्सना एका आठवड्यासाठी किंवा एका महिन्यासाठी ऑफर करते. मात्र आता अशी माहिती मिळाली आहे की, युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅनचा ट्रायल कालावधी संपूर्ण एका महिन्याने वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आता युजर्सना संपूर्ण दोन महिन्यांपर्यंत युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शनचे मोफत ट्रायल अनुभवता येणार आहे. या ऑफरचा फायदा कसा घ्यायचा याबाबत जाणून घेऊ. (फोटो सौजन्य – Pinterest)
युट्युब प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅनचे हे एक मोफत ट्रायल असल्यामुळे अनेकांना असे वाटते की रेगुलर प्रीमियम प्लॅनच्या तुलनेत यामध्ये काही मर्यादा घातल्या जाऊ शकतात. मात्र चांगली गोष्ट म्हणजे असे काहीच नाही आहे. युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅनचे सर्व फीचर्स फ्री ट्रायलमध्ये ऑफर केले जातात. जसे जाहिरातीशिवाय व्हिडिओ पहाणे, बॅकग्राऊंडमध्ये व्हिडिओ चालवण्याची सुविधा आणि संपूर्ण व्हिडिओ एचडी क्वालिटीमध्ये ऑफलाइन डाऊनलोड करण्याची सुविधा फ्री ट्रायलमध्ये ऑफर केली जाते. तसेच या मोफत ट्रायलमध्ये युट्युब म्युझिकचा फ्री एक्सेस देखील मिळतो.
युट्युब प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅनचे दोन महिन्याचे मोफत ट्रायल कसे मिळवले जाऊ शकते याबाबत जाणून घेऊया. हे ट्रायल मिळवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
जर तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये दोन महिन्यांच्या फ्री ट्रायल ऑफरचा पर्याय दिसत नसेल तर अशी शक्यता आहे की ही सुविधा अद्याप सर्व युजर्ससाठी जारी करण्यात आली नाही. कंपनीने त्यांची ही नवीन सुविधा काही निवडक यूजरसाठी सुरू केली असण्याची शक्यता आहे.






