यूबोनेची पॉवर बँक सिरीज लाँच! आता प्रवासात चार्जिंगची चिंता होणार दूर, जाणून घ्या वैशिष्ट्य
ॲक्सेसरी आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी यूबोनने नवीन उच्च-क्षमतेचे पॉवरबँक्स सादर केले आहेत. कंपनीने पीबी-एसएक्स५०१ रिलोड सिरीज आणि पीबी-एसएक्स७०१ बंकर सिरीज हे दोन नवीन पॉवर बँक्स सादर केले आहेत. हे पॉवर बँक्स विशेषतः अशा युजर्ससाठी डिझाइन केले आहेत ज्यांना प्रवास, आउटडोअर ॲडव्हेंचर्स, रोड ट्रिप्स किंवा आपत्कालीन परिस्थितीत विश्वसनीय पॉवर बॅकअपची आवश्यकता असते. पीबी-एसएक्स५०१ रिलोड सिरीजची किंमत ८,९९० आहे, तर पीबी-एसएक्स ७०१ बंकर सिरीज 9,990 मध्ये उपलब्ध होईल.(फोटो सौजन्य – AI)
पीबी-एसएक्स ५०१ रिलोड सिरीज पॉवर बैंकमध्ये ४०,००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. हे २२.५ वेंट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि यात पॉवर डिलिव्हरी (पीडी) व क्विक चार्ज (क्यूसी) तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर उपकरणे अधिक वेगाने चार्ज होतात. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये दोन यूएसबी पोर्ट आणि दोन टाईप-सी पोर्ट समाविष्ट आहेत. या पॉवर बँक मध्ये हाय-बीम टॉर्च आणि ॲम्बियंट लाईटची सुविधा आहे, जे सौम्य आणि प्रखर असे दोन्ही प्रकाश मोड देतात. यात बॅटरी चार्जची स्थिती तपासण्यासाठी एक एलईडी डिस्प्ले आणि सहज वाहून नेण्यासाठी एक मजबूत कॅरींग स्ट्रॅप देखील आहे.
Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान
ज्या वापरकर्त्यांना आणखी जास्त बॅटरी बॅकअपची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी कंपनीने पीबी-एसएक्स ७०१ कर सिरीज सादर केली आहे. यात ६०,००० एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी आहे, जी एकाच चार्जवर अनेक उपकरणे अनेक वेळा चार्ज करू शकते. या मॉडेलमध्ये २२.५ वेंट पीडी आणि क्यूसी फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. याची बॅटरी क्षमता एका सामान्य स्मार्टफोनला शून्यापासून पूर्ण चार्ज करण्यासाठी डझनभरापेक्षा जास्त वेळा पुरेशी आहे. या पॉवर बँक मध्ये तीन यूएसबी पोर्ट आणि दोन टाईप-सी पोर्ट आहेत, ज्यामुळे एकाच वेळी अनेक उपकरणे चार्ज करता येतात. यात हाय-बीम टॉर्च, ॲम्बियंट लाईट, एलईडी बॅटरी डिस्प्ले आणि एक मजबूत कॅरींग स्ट्रॅप यांसारख्या वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. ही पॉवर बैंक लांबच्या प्रवासात, कौटुंबिक सुट्टयांमध्ये आणि घराबाहेरील कॅम्पिंगमध्ये खूप उपयुक्त ठरू शकते.






