केसांची नैसर्गिक पद्धतीने वाढ होण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
अळशीच्या बिया, चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी केवळ केसांच्या कूपांना पोषण देत नाहीत तर टाळूला देखील निरोगी ठेवतात. ते रक्त प्रवाह वाढवतात आणि जळजळ कमी करतात, ज्यामुळे केस लांब आणि दाट होतात. आथा याचा नक्की वापर कसा करायचा आणि कशा पद्धतीने याची केसांसाठी मदत मिळते जाणून घेऊया. ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
भोपळ्याच्या बिया
भोपळा ही केवळ एक भाजी नाही तर त्याच्या बियांमध्येदेखील भरपूर पोषण असते. भोपळ्याच्या बिया केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा साठा आहेत. त्यात झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि प्रथिने असतात, जे केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जातात. तुम्ही भोपळ्याच्या बिया भाजून सूप आणि सॅलडमध्ये खाऊ शकता. याशिवाय नाश्त्यातही तुम्ही भोपळ्याच्या बियांचा वापर करू शकता
जवस अर्थात आळशीच्या बिया
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या कूपांना पोषण देतात. त्यात लिग्नान आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते, जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जाते. तुमच्या आहारात जवसाच्या बियांचा समावेश केल्याने केसांची लांबी वाढण्यास मदत होते. तुम्ही ते स्मूदी आणि सॅलडमध्ये खाऊ शकता. याशिवाय ब्रेडवर वा पोळीमध्ये लाऊनही जवसच्या बियांचा वापर तुम्ही खाण्यात करून घेऊ शकता
चिया सीड्स
चिया सी़ड्स हे नाव ऐकताच मनात येणारा पहिला विचार वजन कमी करण्याचा येतो, कारण ते वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त वापरले जातात. तथापि, त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी उपयुक्त असतात. तुम्ही ते स्मूदी किंवा दह्यात मिसळून खाऊ शकता. याशिवाय रोज सकाळी तुम्ही पाण्यात भिजवून चिया सीड्सचे सेवन करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






