IND vs USA, T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आज सुरू झाली आहे. अमेरिकेविरुद्ध भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामन्यात अमेरिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला आहे. अमेरिकेच्या गोलंदाजीसमऑर भारताच्या टॉप ऑर्डरने नांगी टाकली आहे. भारताने आपल्या सुरुवातीच्या ४ विकेट्स अवघ्या ४६ धावांवर गमावल्या आहेत.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी अमेरिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मोनांक पटेलचा हा निर्णय अमेरिकेच्या गोलंदाजांनी सार्थक ठरवला. भारताचा संघ आपली सुरुवात चांगली करू शकला नाही. भारताने दुसऱ्याच षटकात ८ धावांवरच आपला पहिला गडी गमावला. भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा भोपळा न फोडताच माघारी गेला. त्याला अली खानने बाद केले.
त्यानंतरही भारताची टॉप ऑर्डर झटपट बाद झाली. भारताने ६ ओव्हरमध्ये ४६ धावांवर आपल्या ४ विकेट्स गमावल्या. इशान किशन १६ चेंडूत २० धावा, तिलक वर्मा १६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २५ धावा आणि शिवम दुबे ० धावा करून बाद झाले. भारत ६ ओव्हरमध्ये ४६ धावा अशा नाजुक परिस्थितीमध्ये पोहचला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव एक बाजूने डाव सावरत होता. परंतु, भारताच्या विकेट्स एक बाजूने जात होत्या. रिंकू सिंग देखील जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. तो १४ चेंडूत ६ धावा करून बाद झाला हार्दिक पंड्याकडून अपेक्षा होत्या परंतु तो देखील झटपट बाद झाला. पंड्या ५ धावा करून बाद झाला.
सध्या मैदानावर कर्णधार सूर्यकुमार यादव ३५ धावांवर खेळत आहे, त्याच्या साथीला उपकर्णधार अक्षर पटेल १ धावांवर खेळत आहे. भारताच्या १५ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून ९४ धावा झाल्या आहेत. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ३ तर अली खान, मोहम्मद मोहसीन आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या आहेत. अजून ५ ओव्हर शिल्लक असून भारताकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.
भारत इलेव्हन : इशान किशन (w), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्लेइंग इलेव्हन: अँड्रिज गॉस (डब्ल्यू), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (क), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावलकर






