फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांच्या आपल्या कारकडून असणाऱ्या अपेक्षा दिवसेंदिवस बदलत आहे. यामुळेच तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारमध्ये उत्तम फीचर्स समाविष्ट करत असतात. पूर्वी कार खरेदी करताना ग्राहक फक्त त्याचा मायलेज आणि किंमत या दोनच गोष्टींकडे लक्ष द्यायचे. पण आता ही स्थिती बदलली आहे. आजचा ग्राहक आपल्या कारमध्ये सेफ्टी फीचर्स आहेत का? या गोष्टीकडे देखील लक्ष देत असतो. हल्लीच्या कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स दिले जातात. त्यातीलच एक फिचर म्हणजे ADAS (Advanced Driver Assistance System).
Nissan Magnite खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल Down Payment? ‘एवढा’ असेल EMI?
गेल्या काही वर्षांत, भारतीय ग्राहकांसाठी कार खरेदी करताना सुरक्षितता हा एक खूप महत्त्वाचा घटक बनला आहे. जर आपण सुरक्षा फीचर्सबद्दल बोललो तर, अलिकडच्या काळात ADAS टेक्नॉलॉजी खूप लोकप्रिय बनत चालली आहे. जर तुम्ही ADAS प्रीमियम सेगमेंटच्या कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा 5 बजेट फ्रेंडली ADAS सुसज्ज कारबद्दल जाणून घेणार आहोत.
होंडाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये कंपनीने त्यांच्या लोकप्रिय सेडान अमेझचे अपडेटेड व्हर्जन लाँच केले होते. या अपडेटेड होंडा अमेझमध्ये ग्राहकांना ADAS टेक्नॉलॉजी मिळाली आहे. होंडा अमेझचा ADAS सुसज्ज व्हेरियंट देखील 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.
महिंद्रा XUV 3XO ही देशातील दुसरी सर्वात स्वस्त कार आहे, जी ADAS ने सुसज्ज आहे. कंपनीने 2024 मध्ये लेव्हल-2 एडीएएस टेक्नॉलॉजीसह ते लाँच केले होते. हा व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 12.24 लाख रुपये खर्च करावे लागतील.
ह्युंदाई व्हेन्यू ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. ह्युंदाई व्हेन्यू एसएक्स (ओ) व्हेरियंटमध्ये एडीएएस टेक्नॉलजी उपलब्ध आहे, ज्यासाठी ग्राहकांना 12.40 लाख रुपये खर्च करावे लागतील.
तापत्या उन्हापासून कारच्या पेंटचा बचाव कसा कराल? ‘या’ सोप्या टिप्स ठेवा लक्षात !
होंडा सिटी ही देशातील लोकप्रिय सेडान कारपैकी एक आहे. ग्राहकांना होंडा सिटीमध्ये ADAS तंत्रज्ञान देखील मिळते. होंडा सिटी ADAS सुसज्ज व्हेरियंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 12.70 लाख रुपये खर्च करावे लागतील.
किया सोनेट ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हींपैकी एक आहे. ही कार ADAS ने सुसज्ज आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी 14.72 लाख रुपये खर्च करावे लागतील. किया सोनेटमध्ये लेव्हल-1 एडीएएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.