रेल्वे प्रशासन 1400 गाड्या जादा चालवणार (फोटो- ai gemini)
होळीनिमित रेल्वे प्रशासनाची जोरदार तयारी
देशभरात 1440 स्पेशल ट्रेन्स धावणार
रेल्वे प्रशासनाने जारी केले पत्र
देशभरात आता होळीचा सण येणार आहे. होळी म्हणजे रंगांचा, प्रेमाचा सण समजला जातो. देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात सजरा केला जातो. होळीच्या निमित लोक आपापल्या गावाला जात असतात. दरम्यान मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास करताना दिसून येतात. दरम्यान आता होळीनिमित रेल्वे प्रशासन देखील तयार झाले आहे. होळीनिमित्त रेल्वे प्रशासन स्पेशल ट्रेन्स चालवणार आहे.
होळीनिमित्त लाखो नागरिक आपल्या गावी जातात. त्यासाठी रेल्वे मंत्रालय स्पेशल गद्य चालवणार आहे. रेल्वे मंत्रालयाने पत्रक जारी केले आहे. मार्च महिन्यात रेल्वे तब्बल 1410 अधिक गाड्या चालवणार आहे. रेल्वेने गर्दीचे प्रमाण लक्षात घेता स्पेशल गाड्यांचे प्रमाण दीड पट वाढवले आहे.
2025 मध्ये होळीनिमित 1144 गाड्या चालवण्यात आल्या होत्या. मात्र या वर्षी हा आकडा वाढला आहे. गरज पडल्यास याची संख्या 1500 पर्यन्त वाढवली जाऊ शकतो. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे अधिक सोपे आणि आरामदायी होणार आहे.
ईस्ट सेंट्रल विभाग चालवणार जास्त रेल्वे
ईस्ट सेंट्रल रेल्वे होळीनिमित्त सर्वाधिक गाड्या चालवणार आहे. पूर्व, मध्य आणि उत्तर भागात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वेस्टर्न रेल्वे 231 गाड्या चालवणार आहे. सेंट्रल रेल्वे 209 चालवणार आहे. साऊथ सेंट्रल रेल्वे 160 गाड्या चालवणार आहे. तर उत्तर विभाग 108 गाड्या चालवणार आहे.
तोच घारणेडा वास अन् तोच अस्वच्छ प्रवास..! भारतीय रेल्वेच्या तिकीटात वाढ मात्र सोयी सारख्याच
सुविधा आणि सुरक्षेवर विशेष लक्ष
सणासुदीच्या काळात रेल्वेवरील ताण वाढतो. शहरातील लोक आपल्या परिवारासह गावी जातात. काही मार्गांवर रेल्वेच्या तिकीटांची अधिक मागणी असते. त्यामुळे रेल्वेने स्पेशल गाड्या चालवायचा निर्णय घेतला आहे.
पुणे ते दिल्ली Vande Bharat Express सुरू करावी
पुणे–दिल्ली दरम्यान थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी राज्यसभेत उपस्थित करण्यात आली आहे. भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी रेल्वे मंत्रालयाकडे औपचारिकरीत्या मांडली. पुणे हे शिक्षण, उद्योग, आयटी, संरक्षण आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून देशाची राजधानी दिल्लीशी थेट, वेगवान आणि प्रीमियम रेल्वे सेवा सुरू होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.






