फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
अॅलेक्स कॅरी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने कमालीची कामगिरी केली आहे. पहिल्या डावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने श्रीलंकेला त्याच्या घरच्या मैदानावर २५७ धावांवर रोखले तर पहिल्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला एकतर्फी विजय मिळवून दिला. आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावांमध्ये ४१४ धावा केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी शतक ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने १३१ धावांची खेळी खेळली तर अॅलेक्स कॅरीने संघासाठी १५६ धावांची दमदार खेळी खेळून संघासाठी मोठी धावसंख्या उभी केली.
आता ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला. गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने १५६ धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह, तो आता आशियामध्ये १५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणारा पहिला कांगारू यष्टीरक्षक बनला आहे.
शुक्रवारी म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून अॅलेक्स कॅरी आशियात कसोटी शतक झळकावणारा दुसरा ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ठरला. क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपात कॅरीचे हे दुसरे शतक होते आणि डिसेंबर २०२२ नंतरचे त्याचे पहिले शतक होते. त्याने ११८ चेंडूत शतक झळकावले आणि आशियामध्ये चार शतके झळकावणाऱ्या माजी दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या यादीत सामील झाला.
अॅलेक्स कॅरीने चार शतकांपैकी त्याने बांगलादेश आणि श्रीलंकेत प्रत्येकी एक शतक ठोकले आहे, तर दोन शतके भारतात ठोकली आहेत. आशियाई नसलेल्या खेळाडूने सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या दिग्गज फलंदाज अँडी फ्लॉवरकडे आहे, ज्याने पाच शतके झळकावली आहेत.
संघाने फक्त ९१ धावांत तीन विकेट गमावल्या असताना तो फलंदाजीला आला. येथून त्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत जबाबदारी स्वीकारली आणि चौथ्या विकेटसाठी २५९ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, स्मिथने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ३६ वे शतक झळकावले आणि १३१ धावांची दमदार खेळी केली. या दोन्ही खेळाडूंमधील या भागीदारीच्या जोरावर, कांगारू संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे.
Unbeaten centuries from Steve Smith and Alex Carey handed Australia the advantage over Sri Lanka 🔥#WTC25 | #SLvAUS 📝: https://t.co/PVPw6kEWQP pic.twitter.com/l1kvVHDvmW
— ICC (@ICC) February 7, 2025
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये देखील कमालीची कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यांमध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी पाहता मजबूत स्थितीत संघ उभा आहे. पण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल मार्श, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, कॅमेरॉन ग्रीन आणि मार्कस स्टोइनिस चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत.