राजधानी दिल्लीमध्ये थंडीची लाट आली असून प्रचंड धुके पसरले आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. यामुळे गाड्या चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये देखील हवेमध्ये वाढणारे प्रदुषण यामुळे दिल्लीकरांना श्वासाचे आजार होत आहेत. यामध्ये आता आणखी एक नवीन समस्या उद्भवली आहे.
गंभीर वायू प्रदूषणाच्या परिस्थितीतही एयर प्युरिफायर्सवर १८ टक्के जीएसटी का लावला जातो? असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला विचारला, न्यायालयाने केंद्र सरकारकडून त्वरित उत्तर मागितले आहे.
राजधानी दिल्लीत प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. सध्या सगळीकडे थंडी असल्याने या वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे राजधानीतील हवा काही प्रमाणात शुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे.