Photo Credit : Social Media
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पुजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामाजात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पूजाला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र केबिन मिळावे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत: तहसीलगदारांनी ही तक्रार दिली आहे.
दिलीप खेडकरांची पत्नी मनोरमा खेडकर यांना मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. नुकताच त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर आता दिलीप खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. दिलीप खेडकरांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबाब नोंदवल्यानतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पूजा खेडकरला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र केबिन मिळण्यासाठी दिलीप खेडकरांनी कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकला होता. या प्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
प्रशिक्षण काळ सुरू असतानाही पूजा खेडकरने स्वतंत्र केबिन मागणी, गाडीला अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी पाटी लावल्याचे आढळून आले होते. पूजा यांच्या अवास्तव मागण्यांविरोधात तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे करण्यात आली. सुहास दिवसें यांनी या प्रकरणाता अहवाल राज्य शासनाकडे पाठवल्यानंतर पूजा खेडकर आणि कुटुंबाचे एक-एक पराक्रम समोर येऊ लागले आहेत.