महाराष्ट्रात उष्णतेची लाट (फोटो-istockphoto)
पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अनेक भागात कडक उन्हाळा जाणवत आहे. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उद्रेक मांडला आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव, भुसावळ भागात उष्णतेची लाट दिसून येत आहे. भुसावळ तालुक्यात तापमान 45 अंशावर जाऊन पोचले आहे.
45 अंश तापमान हे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट असण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमान वाढलेले असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले आहे. सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
यंदाच्या मोसमातील 44.2 अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी तापमान अकोल्यात नोंदवण्यात आली. अकोल्यात सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घ्यावी.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळरत्नागिरी जिल्हयावर वादळी वाऱ्यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकणात अवकाळी पाऊस पहायला मिळणार आहे. कोकण विभगाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले आंबे झाडावरून तुटून गेले आहेत. लहान लहान कैरी देखील गळून पडल्या आहेत. ढगाळ आणि पावसाळी वातावरण झाल्याने आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा पाऊस, गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील दोन te तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.