काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाची नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मैत्री झाली होती. पीडित तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी लिपिक अभिषेक सातपुते याने तगादा लावला. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने हतबल होऊन रुमालाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Latur Crime: लातूर हादरलं! 6 वर्षीय पुतण्याचा खून चुलतीनेच केला; 17 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश
पोलीस तपास सुरु
या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जनदात्या आईनेच दिली सुपारी! पाहुण्यांकडे जायचं आहे सांगत नेले आणि…; हिंगोलीतील घटना
हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. अनैतिक प्रेम संबंधातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. सेनगाव तालुक्यातील शिवारात सापडलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत संपूर्ण कट उघड केला.
काय घडलं नेमकं?
८ एप्रिल रोजी जामदया ते खिल्लार रस्त्यावर एका युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलीस लोणार तालुक्यातील वढव गावात पोहोचले. रामदास विश्राम तनपुरे (वय ६५) याच्यावर संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याची सखोल तपस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. चौकशीत तनपुरे याचे सचिनच्या आई लीलाबाई हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या संबंधात सचिन अडथळा ठरत असल्याने लीलाबाईने त्याला संपवण्याचा कट रचला. तिच्या सांगण्यावरून तनपुरे याने नरेश साबण्या पवार याला २५ हजार रुपयांची सुपारी दिली.आरोपींनी सचिनला “पाहुण्यांकडे जायचे आहे” असे सांगून आपल्या सोबत नेले. त्यानंतर साखरा परिससरात त्याला मद्य पाजण्यात आले. त्यानंतर जामदया शिवारात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. लीलाबाई, रामदास तनपुरे आणि नरेश पवार असे तिघांना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीविरोधात पुढील कारवाई पोलीस करत असून या अमानुष घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात.
Ans: अनैसर्गिक संबंधांसाठी होत असलेला दबाव व मानसिक छळ.
Ans: आरोपी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.






