1941 च्या Willys MB पासून प्रेरित मॉडेल ही स्पेशल एडिशन 1941 च्या ‘Willys MB’ मॉडेलपासून प्रेरित आहे, ज्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हे नवीन मॉडेल त्या सुवर्णकाळाची आठवण करून देते. विशेष म्हणजे, यात ‘Wrangler Rubicon’ सारखीच शक्ती आणि तितकेच Advanced फीचर्स देण्यात आलं आहेत.
‘लिमिटेड एडिशन’ कार असल्यामुळे ती अत्यंत खास आहे. भारतात विक्रीसाठी याचे फक्त 41 युनिट्स उपलब्ध असतील. याचा अर्थ असा की, प्रत्येकजण ही कार खरेदी करू शकणार नाही. प्रत्येक वाहनावर विशेष ग्राफिक्स आणि ‘स्पेशल आयडेंटिफिकेशन मार्क’ असतील, ज्यामुळे ही कार इतर वाहनांपेक्षा हटके आणि प्रीमियम लूक देईल.
रँग्लर विलीज 1941 आवृत्तीमध्ये काही खास अॅक्सेसरीजचा समावेश करण्यात आला आहे: कारमध्ये चढणं आणि उतरणं सोपं व्हावं यासाठी पॉवर-ऑपरेटेड ऑटोमॅटिक फूटस्टेप्स देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी कंपनीने यामध्ये ‘बिल्ट-इन डॅश कॅमेरा’ दिला आहे. कारच्या बॉडीवर मिलिट्री लूक देणारे स्टिकर्स आणि डिझाइन दिले आहे, जे तिला अधिक रांगडा लूक देतात. या मॉडेलच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जीप रुबिकॉनमध्ये असलेले शक्तिशाली इंजिन आणि ‘फोर-व्हील ड्राईव्ह’ सिस्टीम यामध्येही कायम आहे. कोणत्याही आव्हानात्मक रस्त्यांवर चालवण्यासाठी ही कार पूर्णपणे सक्षम आहे.
ही स्पेशल एडिशन स्टँडर्ड ‘रुबिकॉन’ मॉडेलपेक्षा 2 लाखांनी महाग आहे. सध्या रुबिकॉन मॉडेलची किंमत 68.31 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ग्राहक ही कार देशातील कोणत्याही अधिकृत जीप शोरूममधून बुक करू शकतात. याशिवाय, ग्राहक 3.6 लाख रुपयांचा एक अतिरिक्त ‘अॅक्सेसरीज पॅक’ देखील खरेदी करू शकतात, ज्यामध्ये रूफटॉप कार्गो कॅरियर, साईड लॅडर आणि सनरायडर रूफटॉप सिस्टीमचा समावेश आहे.






