Hingoli Zilla Parishad Election: उमेदवाराचा पराभव करा अन ७१ लाख जिंका... ; संतोष बांगरांची पैज
राज्यातील आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संतोष बांगर यांनी तब्बल ७१ लाख रुपयांची पैज लावली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील भाजपविरुद्ध (BJP) एकनाथ शिंदे शिवसेना, अशी लढत होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीशी लढत आहे.
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना मित्रपक्ष भाजप आणि विरोधकांशी सामना करत असतानाच, संतोष बांगर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या 71 लाखांच्या पैज लावली आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळदरी गावात यात्रेनिमित्त आमदार संतोष बांगर यांनी कुस्तीच्या मैदानात शिवसेना कार्यकर्ते संजय भुरके यांची थेट जिल्हा परिषद उमेदवारी जाहीर केली.
भुरके यांना विजयी करणार असल्याचे सांगत त्यांनी ५१ लाख रुपयांची पैज लावली. तसेच भुरके यांना पराभूत करून दाखवल्यास ७१ लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणाही केली. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे. प्रकरणाबाबत कायदेशीर तक्रारीची शक्यता देखील तपासली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.






