राहुल गांधी म्हणाले की, ‘तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेस पक्षावर आरोप केले आणि आमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देण्यास सुरुवात केली. चिनी टँक कैलास पर्वतरांगांपासून काहीशे मीटर अंतरावर भारतीय जागांवर होते, असे सांगत राहुल गांधींनी सुरूवात करताच, एकामागून एक तीन वरिष्ठ मंत्री उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न केला…
राजनाथ सिंह: राहुल गांधींवर निशाणा साधत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “राष्ट्रपतींच्या भाषणात या गोष्टींचा उल्लेख नव्हता. राहुल गांधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत ते कधीही प्रकाशित झालेले नाही. राहुल गांधीचा संदर्भ चुकीचा आहे.
अमित शहा: अमित शहा यांनीदेखील राहुल गांधींवर आक्षेप निशाणा साधला. त्यांनी सर्वात आधी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही हे उघड करावे. राहुल गांधी इतर कोणाचेही लेखन वाचू शकत नाहीत.” असा दावा करत राहुल गांधींच्या पुस्तक वाचण्यावर आक्षेप घेतला.
Sunil Tatkare on NCP Merge: ‘विलीनीकरण कोणाचे आणि कोणात?’ सुनील तटकरेंचा शरद पवार गटाला रोखठोख
किरेन रिजिजू: रिजिजू यांनी, “तुम्ही सभागृहाचे नियम मोडत आहात. संसद नियमांनुसार चालते आणि तुम्ही येथे अप्रकाशित पुस्तकाबद्दल बोलू शकत नाही.” असं सांगत राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी ” नरवणे यांच्या पुस्तकात पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांबद्दल लिहिण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यावर,”ते पुस्तक प्रकाशित झालेले नाही. अप्रकाशित पुस्तक संसदेत वाचले जाऊ शकत नाही. या पुस्तकात चुकीचे युक्तिवाद आहेत. म्हणूनच पुस्तक प्रकाशित होऊ दिले नाही,पण राहुल गांधी तेच पुस्तक वाचक आहेत, जे चुकीचे आहे.” असे स्पष्टीकरण राजनाथ सिंह यांच्याकडून करण्यात आला.






