Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार : काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर
अशातच काल भिंवडीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आणि तिथेच वादाची ठिगणी पडली. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. लाठ्या-काठ्या, हाणामारी झाली, एकमेकांच्या दिशेने खुर्च्यां फेकल्या गेल्या, यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून नारपोली व भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रचारसभेचा रंग चढू लागला आहे. अशातच शनिवारी रात्र नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.वादाचे रुपांत हाणामारीत झाले. दोन्ही गटात लाठ्या- काठ्या व दगडांचा मारा झाला, यात दोन कार्यकर्ते जखमीही झाले. नारपोली रस्त्यावर भाजपचे उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय समोरासमोर आहे. शनिवारी रात्री काँग्रेसची प्रचाररॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाच्या दिशेने घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये आधी बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीपर्यंत गेले.
काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेने प्लॅस्टिक खुर्च्या, लाठ्या-काठ्या व दगड भिरकावले. महत्त्वाची बाब म्हणजे, या चौकात बंदोबस्तावर पोलिस तैनात होते. रॅलीतदेखील पोलिस होते. पोलिसांच्या समोरचे हा राडा झाला. याप्रकरणी भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे.
Umrah Tragedy : सौदीत केरळच्या कुटुंबावर काळाचा घाला; उमराह आटोपून परतताना 4 जणांचा भीषण अंत
काँग्रेस नगरसेविका वैशाली म्हात्रे यांच्या मुलगी हर्षाली यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर नारपोली आणि भोईवाडा पोलीस ठाण्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून संबंधित पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






