'नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड्स २०२५' च्या शानदार सोहळ्यात सागर विसावाडिया यांना 'रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर' (Real Estate Changemaker of the Year) या पुरस्काराने गौरवण्यात आले.
नवभारत समूहाच्या या उपक्रमाने इन्फ्लुएन्सर्समध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अनेक इन्फ्लुएन्सर्सनी नवभारत समूहाचे आभार मानले आणि मंचावरून आपल्या भावना मनमोकळेपणे व्यक्त केल्या.
शर्विकाला 'बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर' (Best Sports Influencer) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शर्विकाने ऐतिहासिक संवाद सादर करून उपस्थितांची 'वाहवा' मिळवली.
नवभारत समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट श्रीनिवास राव आणि कार्यकारी संपादक संजय तिवारी यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण 'इन्फ्लुएन्सर्स'ना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना यावेळी सन्मानित करण्यात येत आहे. डान्स इन्फ्लुएन्सर कुणाल मोरे याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्स्फूर्तपणे डान्स करून उपस्थितांची मने जिंकली.