रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…
कोणी लावली डोक्याला पिस्तुल?
पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेल्या तक्रारीनुसार तेरखेडा मधील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार व महादेव विठ्ठल घुले यांचा कला केंद्रावर ती येणं जाणं होतं. मात्र यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारामधून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार यांनी थेट निर्मला जाधव यांचा घर फोडण्याची धमकी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं चोराखळी मधील कला केंद्र हे सील करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथे भाड्याने दुसरं कला केंद्र सुरू केलं. रविवारी पहाटे दोन वाजता कला केंद्र बंद केल्यावरती त्या इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत असताना एका चार चाकी वाहनांना त्यांचा पाठलाग केला. पहाटेच्या सुमारास दार उघड असतानाच तोंडाला कापड लावून पाच ते सहा जण घरामध्ये शिरले सुरुवातीला शिवम गंगावणे याला मारहाण करण्यात आली. तर निर्मला जाधव यांच्या डोक्याला लावण्यात आला आणि दमकावून घरातील सगळं सोनं लंपास करण्याचा प्रयत्न केला.
दरोडा घालताना तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आरोपींनी थेट डोक्याला पिस्तूल लावली व डोळ्यात थेट मिरचीची पूड टाकण्याची धमकी दिली. दरोडा टाकत असताना एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार हा आहे. हे ओळखूनही जीवाला धोका असल्याचा लक्षात आल्यानंतर आरोपींची ओळख तत्काळ उघड केली नाही असं तक्रारीमध्ये म्हणण्यात आले. या दोड्यामध्ये सचिन पवार सह पाच इतर आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. येरमाळा पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी तपास केला जात आहे.
निर्मला जाधव यांचं कला केंद्र केलं होत सील निर्मला जाधव यांचा कला केंद्र त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र नावाने त्या कला केंद्र चालवतात. मात्र मध्यंतरी चोराखडी रस्त्यावर असलेल्या कला केंद्रावर धाराशिव चे जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाई केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा बदल करत बार्शी रस्त्यावरती जिल्हा सोलापूर येथे स्वतःचे कला केंद्र सुरू केलं. मात्र आर्थिक व्यवहारामधून झालेला भाग हा थेट दरोडा टाकण्यापर्यंत पोहोचला आणि येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये घरात दरोडा टाकण्याची तक्रार देण्यात आली आहे. निर्मला जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येरमाळा पोलीस अधिक तपास करत आहे ज्या संस्थेत आरोपींचा येणं जाणं कला केंद्रावर होतं किंवा कोणत्या आर्थिक कारणावरून या सगळ्यांमध्ये वाद झाला याचा तपास येरमाळा पोलिसांकडून केला जात आहे. मात्र डोक्याला पिस्तूल लावून धमकावले ना या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल आरोपींचा शोध सध्या येरमाळा पोलीस घेत आहेत दिलेल्या तक्रारीनुसार खरंच याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे पोलीस चौकशीनंतर समोर येऊ शकत मात्र ज्या संस्थेत आरोपींची नावे घेतलेली आहेत त्यांची चौकशी ही येरमाळा पोलिसांकडून केली जाईल निर्मला जाधव यांच्या डोक्याला स्टेट पिस्तूल लावल्याने त्यांच्या कला केंद्रात घबराटीचे वातावरण निर्माण झाला आहे.
Ans: येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बार्शी रोडवरील कला केंद्रात.
Ans: एकूण जवळपास 9.51 लाख रुपयांचा सोनं व रोख लंपास झाला.
Ans: डोक्याला पिस्तूल लावणे आणि डोळ्यात मिरची पूड टाकण्याची धमकी.






