Kokan Rain: रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणकिनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जोरदार पावसामुळे गरज असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. काही नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. बाजारपेठेत पाणी शिरले आहे.
रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा कहर (Rain in Raigad) सुरुच आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने 27 ते 29 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना ताम्हिणी घाटातून प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचं नुकसान झालं आहे. तुम्ही कोकणात जाणार असाल तर अशा मार्गावरून जाणं टाळा.
महाड तालुक्यातील दासगाव येथे भली मोठी संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात खचली आहे. त्या संरक्षक भिंतीच्या खाली नागरी वस्ती आहे, त्यामुळे प्रविण दरेकर यांनी तातडीने येथे योग्य मदत कार्य करण्याच्यादृष्टीने तहसिलदार…