रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर येथे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी तातडीने आज सकाळी महाड येथे भेट दिली. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली.
महाड तालुक्यातील दासगाव येथे भली मोठी संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात खचली आहे. त्या संरक्षक भिंतीच्या खाली नागरी वस्ती आहे, त्यामुळे प्रविण दरेकर यांनी तातडीने येथे योग्य मदत कार्य करण्याच्यादृष्टीने तहसिलदार काशिद व अन्य अधिका-यांच्या समेवत त्या भागाची पाहणी केली व तेथील लोकांना तातडीने अन्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा जिल्हाध्यक्ष महेश मोहिते,बिपिन महामुणकर, संदिप ठोंबरे आदी उपस्थित होते.
[read_also content=”पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टी; मुंबईसह उपनगरांमध्ये ऑरेंज अलर्ट, NDRF टीम तैनात https://www.navarashtra.com/maharashtra/heavy-rains-in-konkan-for-next-five-day-orange-alert-ndrf-team-deployed-in-suburbs-including-mumbai-nrps-300707.html”]
कोकणासह मुंबई आणि उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरामधील सखल भाग जलमय झाले असून खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं जातंय. शुक्रवारपर्यंत मुंबई आणि कोकणा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. ही परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.