रायगड : रायगड जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा कहर (Rain in Raigad) सुरुच आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने 27 ते 29 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अजून पुढील तीन दिवस पावसाचा कहर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळांना गुरुवारी देखील सुट्टी (School Closed) जाहीर केली आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. आज कुंडलिका नदी ही इशारा पातळीच्यावर वाहत होती. तर सावित्री, आंबा, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पाणी पातळीही इशारा पातळीच्या खाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या जिल्ह्याला गुरुवारी दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना गुरुवारी सुटी जाहीर केली आहे.
तसेच सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.