शनिवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्यांच्या पात्रातून पावसाचे पाणी पात्राबाहेर पडले. परिणामी, जिल्ह्यातील सुमारे १७ प्रमुख, व इतर रस्ते बंद झाले.
उत्तर भारतातील काही भागांमधून मान्सूनने माघार घेतल्यानंतर, पश्चिमेकडील वारे पूर्वेकडे सरकत आहेत, ज्यामुळे उत्तरेकडील डोंगराळ आणि मैदानी भागात पावसाळा संपत आहे.
या वर्षात प्रथमच जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 1 लाख 13 हजार 184 क्युसेकने विसर्ग सुरू असून, 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत.
पुढील 24 तासांसाठी राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार सरी बरसतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
तवाघाट-सोबला रस्त्यावरील सुवा झुला पुलाजवळ दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्ते खुले करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबईतील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहिला मिळत आहे. इतकेच नाहीतर पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस या सारख्या पिकांना या पावसाचा प्रचंड फटका बसला.
गेल्या 24 तासात सरासरी 30.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधारा कोसळत असल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आता नवा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली…
विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, विभागातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा अधिक जोर होता. येथील एकूण १६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.