पुणे, कोल्हापूरसह राज्यातील 17 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट (फोटो- ani)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे समोर आले आहे. मात्र, आता रत्नागिरी, कोल्हापूर पुण्यासह राज्यातील 17 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयएमडी, एनआरएससी या केंद्रीय संस्थांसोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात आल्या आहेत. येत्या चार दिवसांत अतिमुसळधार पाऊस होणार आहे.
जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने हाहा:कार माजवला होता. सप्टेंबर महिन्याची सुरुवातही मुसळधार पावसाने झाली. सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळला, तर पुढील 24 तासांसाठी राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार सरी बरसतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
नाशिक, संभाजीनगर, जालन्यात यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, नाशिक, नाशिक घाट, नंदुरबार, धुळे, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर
सप्टेंबरच्या सुरुवातीला अलर्ट
सप्टेंबरच्या सुरुवातीला अनेक जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात कोणताही विशेष अलर्ट नाही. येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही काळ परिस्थिती अशीच राहिल, असे सांगण्यात आले आहे.