फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स पहिल्या इनिंगचा अहवाल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे, या सामन्यात सुरुवात दिल्लीच्या संघाने सुरुवात चांगली केली होती. पण त्यानंतर संघाने लवकर विकेट गमावले आणि त्यामुळे मोठी धावसंख्या उभी करण्यात दिल्लीचा संघ अपयशी ठरला. यामध्ये दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने १४ चेंडू खेळले आणि यामध्ये त्याने ३४ धावा केल्या. पहिल्या डावांमध्ये फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने 189 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही संघानी कशाप्रकारे कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर जेक फ्रेझर-मॅकगर्क हा आणखी एकदा फेल ठरला. तुपाने ६ चेंडू खेळले आणि यामध्ये त्याने फक्त ९ धावा केल्या. अभिषेक पोरेल यान संघासाठी महत्वाची खेळी खेळली. अभिषेकने संघासाठी ३७ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार आणि ५ चौकार मारले. मागील सामन्यातील महाखेळाडूं करुण नायर या सामन्यात धावबाद झाला. केएल राहुलने संघासाठी ३२ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या.
𝗛𝗼𝗹𝗱 𝗼𝗻! 𝗪𝗲’𝘃𝗲 𝗮 𝗻𝗲𝘄 𝗜𝗣𝗟 𝗳𝗮𝗺𝗶𝗹𝘆 𝗺𝗲𝗺𝗯𝗲𝗿 𝗶𝗻 𝘁𝗼𝘄𝗻 👀
It can walk, run, jump, and bring you a ‘heart(y)’ smile 🐩❤️
And…A whole new vision 🎥
Meet the newest member of the #TATAIPL Broadcast family 👏 – By @jigsactin
P.S: Can you help us in… pic.twitter.com/jlPS928MwV
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
संघाचा कर्णधार अक्षर पटेलने संघासाठी कमालीची खेळी खेळली आणि संघासाठी जलद गतीने धावा केल्या. अक्सरने १४ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या यामध्ये त्याने २ षटकार आणि ४ चौकार ठोकले. ट्रिस्टन स्टब्स याने संघासाठी महत्वाच्या ३४ धावांची खेळी खेळून नाबाद राहिला. त्याने यामध्ये २ षटकार २ चौकार मारले. आशुतोष शर्मा याने संघासाठी १५ नाबाद धावा केल्या.
राजस्थानच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर जोफ्रा आर्चरने संघासाठी २ विकेट्स घेतले यामध्ये त्याने जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. महेश तीक्षणा याने संघासाठी १ विकेट घेतली. वॉशिंदू हंसरंगा याने संघासाठी १ विकेट घेतला आहे. आजच्या सामन्यांमध्ये संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वालकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही सलामीवीर फलंदाज कशी कामगिरी करतात यावर चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे.