फोटो सौजन्य - Rajasthan Royals/Delhi Capitals सोशल मीडिया
राजस्थान रॉयल विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स टॉस अपडेट : आज राजस्थान रॉयल विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२५ चा हा ३२ वा सामना असणार आहे. दिल्ली कॅपिटलच्या संघाने या स्पर्धेची सुरुवात दमदार केली आहे, तर राजस्थान रॉयल्ससाठी स्पर्धेची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामने दोन्ही संघाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील.
राजस्थान रॉयल्सची या सीझनमधील कामगिरीवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सच्या संघाने आतापर्यत ६ सामने खेळले आहेत यामध्ये संघाने २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिले तीन सामने राजस्थानच्या संघाने रियान परागच्या नेतृत्वाखाली केलेले होते त्यानंतर संजू सॅमसन संघाचे नेतृत्व करत आहे. तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या स्पर्धेची सुरुवात संघाने दमदार केली होती. दिल्लीच्या संघाने आतापर्यत आतापर्यत ५ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लगला आहे.
🚨 Toss 🚨@rajasthanroyals won the toss and elected to bowl against @DelhiCapitals in Match 32.
Updates ▶ https://t.co/clW1BIPA0l#TATAIPL | #DCvRR pic.twitter.com/SSsD99s8dN
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
दोन्ही संघामध्ये एकही बदल करण्यात आला नाही. फाफ डूप्लेसी अजूनही दुखापतींशी झुंज देत आहेत त्यामुळे तो संघाबाहेर आहे. तर आजच्या सामन्यांमध्ये यशस्वी जैस्वालवर चाहत्यांची नजर असणार आहे. त्याने मागील सामन्यात कमालीच्या धावा केल्या होत्या. त्याचबरोबर करुण नायरला तीन वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घातला. आजच्या त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल.
३ षटकार मारताच संजू सॅमसन एमएस धोनीचा विक्रम मोडणार, या यादीमध्ये गाठणार अव्वल स्थान
संजू सॅमसन (कर्णधार, यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
करुण नायर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स,अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा