Sant Dnyaneshwaranchi Muktaai Trailer Released
हरिनामाच्या गजरात , टाळ- मृदुंगाच्या तालावर, फुगड्या खेळण्यात दंग झालेले वारकरी, पायांनी धरलेला ठेका, अंभगांच्या स्वरात चिंब झालेले मायबाप प्रेक्षक आणि कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय वातावरणात नुकताच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा भव्य- दिव्य आध्यात्मिक ट्रेलर लाँचिंग सोहळा पार पारडला. या सोहळ्यात चित्रपटातील कलाकाराही वारकऱ्यांसोबत भक्तीत तल्लीन होताना पाहायला मिळाले. काही वेळासाठी तरी का होईना आपले आवडते कलाकार मंडळी सुद्धा वारकरी झालेले पाहायला मिळाले.
भव्य दिव्य आणि आध्यात्मिक असलेला चित्रपटाचा नेत्रदीपक ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या ट्रेलरला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारी।।
संत पंरपरेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे अद्वितीय योगदान आहे. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना दाखवला. तसेच आध्यात्मिक समतेचा आधार घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायची सुरुवात केली. ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून वाईट वागणूक मिळाली.
परंतु, खचून न जाता त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी भागवत संप्रदायाच्या शिकवणीत आपले स्थान निर्माण केले. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा हा चित्रपट आहे. विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या या भावंडांचे अजोड कार्य आणि विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.
२०० कोटींच्या ‘सिकंदर’ला १०० कोटी कमावणंही कठीण, सातव्या दिवशीही भारतात केली तुटपुंजी कमाई
संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे, संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक, संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर, संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी साकारली आहे. शिवाय समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.
ईडीची ‘L2: Empuraan’च्या निर्मात्यांच्या घरावर छापेमारी! कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन जप्त