धक्कादायक ! सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून आला राग; लोखंडी पान्याने केली भावाची हत्या (संग्रहित फोटो)
सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच देवगड येथे तरुणाची हत्या करण्यात आली. सिगारेट पेटवण्यासाठी लायटर दिला नाही म्हणून एकाला प्रचंड राग आला. या रागातूनच एका परप्रांतीय कामगाराने आपल्या भावाच्या डोक्यात व्हील पाना मारून त्याचा खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णकुमार यादव (वय २०, रा. मध्यप्रदेश) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, डोक्यात पाना मारल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजीक ही घटना घडली. याप्रकरणी रितीक यादव (२०, रा. मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे.
हेदेखील वाचा : मित्रानेच दगडाने ठेचून केली मित्राची हत्या; दोघांनी एकत्र मिळून दारू प्यायली अन्…
या चिरेखाणीवर सुमारे 8 ते 10 परप्रांतीय कामगार कामास आहेत. यात नात्याने चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व संशयित रितीक यादव हे दोघेही कामाला होते. कृष्णकुमार आणि रितीकमध्ये सिगारेटच्या लायटरवरून वाद झाला. कृष्णकुमार चिरखाण येथून पुढे जात असताना रितीकने त्याच्या डोक्यात वार करून हत्या केली. घटनास्थळी तपासकार्यात पोलिस उपनिरिक्षक महेश देसाई, पोलिस हवालदार महेंद्र महाडिक, आशिष कदम, भाऊ नाटेकर, पो.कॉ.प्रसाद आचरेकर, दिपेश तांबे, रविंद्र महाले, राजेश पाटील यांनी काम पाहिले.
आरोपीला पोलिसांनी केली अटक
केवळ सिगारेटसाठी लायटर दिले नाही म्हणून तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
मित्रानेच केली मित्राची हत्या
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना दुसऱ्या एका घटनेत, कोल्हापुरातील हुक्केरी तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आली. कणंगला येथे जीवलग मित्राचाच दगडाने ठेचून मित्राने खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली.