सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे आणि सांगलीमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे.
सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे दयनीय अवस्था झाली होती. शेतकऱ्यांची शेती आणि घर संसार हे पूर्णपणे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात 82 गावांमध्ये 120 तात्परते निवारा केंद्र निर्माण केलेली आहेत.
प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे अत्यंत गतिमान पद्धतीने व ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणचे १०० टक्के पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश दिले.