(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Sonu Sood takes big step for flood victims in Solapur :अभिनेता सोनू सूद हा फक्त आपल्या अभिनयासाठीच नव्हे तर सामाजिक कार्यासाठीही देशभर ओळखला जातो. कोरोना महामारीच्या संकटात, जेव्हा अनेक कामगार मुंबईसारख्या शहरात अडकले होते आणि अन्न, पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यास त्रास होत होता, तेव्हा सोनू सूदने स्वतःच्या खर्चाने लाखो कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवले.
या काळात त्याने ट्रेन्स, बसेस आणि इतर वाहतूक व्यवस्था करून अनेकांना सुरक्षितपणे त्यांच्या मूळ गावांपर्यंत पोहचवले. गरजू लोकांना दिलेल्या मदतीमुळे सोनू सूदची लोकप्रियता सर्वसामान्यांमध्ये प्रचंड वाढली आहे.
पंजाबमधील पूरग्रस्त भागात सोनू सूद आणि त्याची टीम त्वरित पोहोचली होती आणि तिथल्या लोकांसाठी अन्नधान्य, स्वच्छ पाणी, औषधे आणि तातडीची मदत पुरवली.पूरामुळे घरे आणि रस्ते तणावाखाली आल्यामुळे स्वच्छता कामे सुरू करण्यात मदत केली.
आता सोनू सूद पुन्हा एकदा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “नमस्कार, सोलापूरमध्ये सीना नदीमुळे जो पूर आला आहे, त्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे, त्याबद्दल आमची टीम माहिती घेत आहे. गरजू कुटुंबांना आम्ही खाण्याचे, मेडिकल कीट्स पोहोचवण्याचे काम करत आहोत.
“आमची चॅरिटी फाउंडेशनची टीम आणि इतर लोक या कार्यात आमच्याबरोबर जोडले जात आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी विनंती करतो, या पुरामध्ये ज्या घरांचे, कुटुंबाचे नुकसान झाले आहे, त्याची पूर्ण माहिती घ्या. आपण त्यांना एकत्रित येऊन पुन्हा सामान्य जीवन जगण्यास मदत करूयात, धन्यवाद; आपण लवकरच सोलापुरामध्ये भेटूयात.”
हम सोलापुर बाढ़ पीड़ितों के साथ हैं।@SoodFoundation 🇮🇳 pic.twitter.com/byQT7U8oKA — sonu sood (@SonuSood) September 28, 2025
दिल्लीतील रामलीलामध्ये Bobby Deol करणार रावणाचा वध
सध्या सोनी सूद सोलापूरमध्ये गेला आहे, त्याने तेथील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या कार्याचे चाहत्यांनी कौतुक केलं आहे.