मिरा भाईंदरमध्ये एका खाजगी कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमीष दाखवलं होतं. लाखो रुपये गुंतवणूकदारांनी गुंतवल्यावर या कंपनीने फसणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला. रामदेव पार्क परिसरात टोरेस नावाची आर्टिफिशल डायमंड विक्री करणारी कंपनी नागरिकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेचा सखोल तपास सुरु आहे. टोरेस कार्यालय खोलून पाहणी करण्यात येत आहे तसेच पंचनामा करण्यात येत आहे .मिरा भाईंदरचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील घटनास्थळी दाखल झाले. नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टोरेस कार्यलात पंचनामा करण्यात येत आहे.