फोटो सौजन्य: Social Media
देशभरात एका नवीन स्कॅमची खूप चर्चा आहे. या स्कॅममुळे मुंबईकरांना आपल्या कष्टाने कमावलेला पैसे गमवावा लागला आहे. मुंबईतल्या टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. गुंतवलेले पैसे कमी कालावधीत दुप्पट करू असे आश्वासन देत कंपनीने अनेक जणांना लाखोंचा गंडा घातला आहे. या कंपनीत कित्येक सामान्य नागरिकांनी आपला पैसा दुप्पट होईल या अपेक्षेने लाखो रुपये गुंतवले होते. पण शेवटी कंपनीच्या मालकाने कोणालाही न सांगता ग्राहकांचे पैसे घेऊन पळ काढला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याच टोरेस स्कॅमबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दादरच्या फुटपाथवर भाजी विकणाऱ्या व्यक्तीने या कंपनीत एक दोन नव्हे तर तब्बल 4 कोटी रुपये गुंतवले होते. एवढी रक्कम ती पण एका भाजी विक्रेत्याकडे असेल असा विचार सुद्धा कोणी केला नसेल. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढा बक्कळ पैसे या भाजीवाल्याकडे आला कुठून? चला याबाबत जाणून घेऊया.
‘पुढच्या जन्मी…’, टॅक्स तरी करा कमी किंवा बदला मध्यमवर्गींयांची परिभाषा, 10 लाखही पडू लागले कमी
टोरेस कंपनीचा घोटाळा उघडकीस झाल्यानंतर, दादर, नवी मुंबई, कल्याण येथील कंपनीचे दुकानं बंद पडली आहे. ही दुकानं बंद पडल्यानंतर अनेक ग्राहकांनी या दुकानाच्या बाहेर ठिय्या मंडल होता. या घोटाळा प्रकरणी टोरेस कंपनीच्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जर तुम्ही टोरेस कंपनीत गुंतवणूक करत असाल तर गुंतवणून केलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे तुम्हाला दार आठवड्याला मिळेल अशी खोटी आश्वासनं कंपनीने ग्राहकांना दिले होते. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने गेल्या काही महिन्यांपर्यंत पैसे ग्राहकांना दिले होते. तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेच्या किंमती एवढेच हिरा देखील दिला. वास्तविक, या हिऱ्याची किंमत बाजारात फक्त 500 रुपये आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोरेस कंपनीत लोकांनी 10 लाख तसेच जास्तीत जास्त 50 लाखपर्यंत गुंतवणूक केल्याचं दिसत आहे. पण आता एका भाजी विक्रेत्याने या कंपनीवर विश्वास ठेवून तब्बल 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
प्रदीपकुमार वैश्य (वय 31 वर्षे) नावाच्या दादरमधील भाजी विकेत्याने Torres Company मध्ये 4 कोटींची गुंतवणूक केली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रदीपकुमार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. दादरमधील टोरेसच्या शोरूमजवळच प्रदीमकुमार यांचा भाजीपाल्याचे दुकानं होते.
प्रदीपकुमार वैश्य यांनी 4 कोटी रुपये आणले कुठून असा प्रश्न हातात विचारला जात आहे. याबाबत स्वतः प्रदीकुमार यांनी खुलासा केला आहे. पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवारासह अनेकांकडून पैसे घेऊन व घर गहाण ठेवून एकूण 4 कोटी 27 हजार रूपयांची गुंतवणूक केल्याचे प्रदीपकुमार यांनी सांगितले.