फोटो सौजन्य: Social Media
नवी मुंबई/ सावन वैश्य: नवी मुंबई, मुंबई, तसेच परिसरातील अन्य 5 ठिकाणी शाखा असलेली, व सध्या वादाचा व चर्चेचा विषय ठरलेली टोरेस कंपनीने अनेक नागरिकांना, हजारो करोड रुपयांना फसवल्याची माहिती समोर आल्यावर गुंतवणूकदारांनी एपीएमसी पोलिसांना धाव घेतली होती. आर्थिक फसवणुकीची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने सदरचा तपासा आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या पंचनाम्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून जवळपास 1 कोटी 90 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरचा ऐवज हा तुर्भेतील टोरेस कार्यालयाच्या तळमजल्यात असलेल्या लॉकरमध्ये जमा करून ठेवला होता. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
90 तास काम करण्याच्या फॉर्म्युल्यावर Bajaj Auto च्या मॅनेजिंग डायरेक्टरचे परखड मत, म्हणाले…
विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार टोरेस कंपनीच्या दादर, तुर्भे, कल्याण, मिरा रोड व कांदिवली या पाच ठिकाणी शाखा आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे या पाचही शाखेच्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून, एकाच वेळी पाच ठिकाणी छापा मारण्यासाठी तयारी करत होते. जेणेकरून एकाच वेळी जास्त मुद्देमाल हस्तगत करून मुख्य आरोपींना बेड्या ठोकता येईल. मात्र छापा मारण्याच्या एक दिवस अगोदर दादर शाखेत झालेल्या गडबडीमुळे नवी मुंबई पोलिसांचा प्लॅन फसला. अन्यथा नवी मुंबई पोलिसांनी या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करून आरोपींना जेर बंद करण्यात यश संपादन करता आले असते. तसेच ग्राहकांना आर्थिक फसवणुकीपासून बचाव करण्यात यश आले असते.
प्रदीपकुमार वैश्य (वय 31 वर्षे) नावाच्या दादरमधील भाजी विकेत्याने Torres Company मध्ये तब्बल 4 कोटींची गुंतवणूक केली होती. त्यांना वाटले की लवकरच त्यांना याचा चांगला परतवा मिळेल. पण असेल झालीये नाही. उलट कंपनीच्या मालकानेच ग्राहकांना धोका देत पळ काढला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रदीपकुमार यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. विशेष म्हणजे दादरमधील टोरेसच्या शोरूमजवळच प्रदीमकुमार यांचा भाजीपाल्याचे दुकानं होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा पैसा भाजी विक्रेत्याकडे आला कसा? तर याचे उत्तर स्वतःच वैश्य यांनी दिले आहे. पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवारासह अनेकांकडून पैसे घेऊन व घर गहाण ठेवून एकूण 4 कोटी 27 हजार रूपयांची गुंतवणूक केल्याचे प्रदीपकुमार यांनी सांगितले. आता ही रक्कम त्यांना पुन्हा परत मिळणार का मोठा प्रश्न प्रदीपकुमार वैश्य यांच्यासमोर आहे.