कल्याण – अमजद खान : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील आरोपी गणपत गायकवाड सह पाच जण तळोजा कारागृहात आहेत. मात्र आमदार गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड हे जे या प्रकरणात आरोपी आहेत. त्यांचा पत्ता अजूनही पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे वैभव गायकवाड आहेत तरी कुठे अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरु झाली आहे. घटनेनंतर फरार झालेले वैभव गायकवाड हे परदेशात पसार झाले आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
३ फेब्रुवारीला हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या दालनाचं शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे साथीदार राहूल पाटील आणि चैनू जाधव यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या प्रकरणी आमदार गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकर, विकी गणात्रा आणि रंजीत यादव यांना अटक झाली. विकी गणात्रा हे घटनेच्या काही दिवसानंतर ठाणे गुन्हे शाखेत आत्म समर्पण केले. या प्रकरणात गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड आणि अन्य एक जण फरार आहे. घटनेच्या दिवशी भाजप आमदार गायकवाड यांनी गोळीबार करण्यापूर्वी महेश गायकवाड समर्थक आणि वैभव गायकवाड यांच्या शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर ते निघून गेले होते. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार योजनाबद्ध पद्धतीने केला गेला आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. वैभव गायकवाड यांच्या शोध पोलीस करत आहेत.
दुसरीकडे गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड या मैदानात उतरल्या आहेत. विकास कामांचे भूमीपूजन सुरु आहे. ही विकास कामे गायकवाड यांच्या समर्थकांना पोसण्यासाठी केली जात आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.