उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरण; वैभव गायकवाडला क्लीन चीट
गेल्या वर्षभरापुर्वी जमिनीच्या वादावरुन माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदेगट माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या उल्हासनगर पोलिस चौकीत शब्दिक चकमकी झाल्या. हा वाद इतका टोकाला गेला असता, गणपत गायकवाड यांनी महेश गयकवाड यांच्यावर भर पोलिस चौकीत गोळीबार केला. या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायर झाले होतेे.
दरम्यान या प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह मुलगा वैभव गायकवाड देखील सहभागी होता त्यामुळे त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. अशी मागणी वारंवार महेश गायकवाड यांनी केली आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. गोळीबार प्रकरणापासून वैभव गायकवाड फरार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतंच .या प्रकरणी उल्हासनगर न्यायालयाच सुनावणी सुरु असाताना वैभव गायकवाडला क्लीन चीट देण्यात आली आहे.
पोलीस चौकीत झालेल्य़ा गोळीबार प्रकरणाने तीव्र स्वरुप धारण केलं होतं. सीसीटीव्ही फुटेडच्या भक्कम पुराव्यामुळे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी अटक करण्यात आली. या दरम्यान गोळीबारात वैभव गायकवाडवर देखील सहभागी असल्याचा आरोप करण्यात आले होते. मात्र उल्हालनगर न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान चार्जशीट सादर करण्यात आली होती.
सादर करण्यात आलेल्या या चार्जशीटमध्ये वैभव गायकवाड विरोधात कोणतेही सबळ पुरावे मिलाले नसल्याचे सांगितले आहे. गोळीबार प्रकरणात वैभव गायकवाडच्या विरोधात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने वैभनला क्वीृन चीट दिली आहे. दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वैभव गायकवाडला दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
अद्याप या प्रकरणापासून वैभव गायकवाड फारार असून पोलीसांचा तपास जारी आहेे. या प्रकरणात गणपत गायकवाड .यांच्यासह नागेश बडेराव आणि कुणाल पाटील या दोन आरोपींचा सहभाग यात सहभाग असल्याचं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. वैभव गायकवाड याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत आणि त्याचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकणात महेश गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांवर राजकीय दबाव ,राजकीय दबावामुळे पोलीस हताश ,पोलिसांना दोष देणार नाही मात्र राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे.वैभव गायकवाड सीसीटीव्ही मध्ये दीसतोय त्याने गुंड प्रवृत्तीची माणसं देखील पोलीस ठाण्यात बोलवली होती, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे. काही दिवसांपुर्वी महेश गायकवाड यांनी फरार असलेल्या वैभव गायकवाडला शोधून देणाऱ्यांसाठी बक्षिस जाहीर केलं होतं.
या गोळीबार प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्य़ा निर्णायावर महेश गायकवाड म्हणाले की, अनेकदा पोलिसांना सांगितलं मात्र मला राजकीय पाठबळ नसल्याने माझं कुणीच ऐकून घेत नाही. त्यामुळे मी न्यायालयाकडे दाद मागणार असं वक्तव्य महेश गायकवाड यांनी केलं आहे.