आपलं एक छान घर असावं असं स्वप्न मुळात कोणाचं असत. प्रत्येकाला एका सुंदर ठिकाणी आपलं घर हवं असत. यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करत असतात. आपल्या हक्कच घर बनवण्यासाठी किंवा घेण्यासाठी लोकांना कित्येक वर्षे लागतात. जीवनात अनेक आर्थिक उलाढाली कराव्या लागतात. मात्र जेव्हा हे स्वप्न साकार होत तेव्हा त्याचा आनंद काही औरच असत. आता तुम्ही विचार करा जर तुम्हाला कोणतेही पैसे न घालवता, फुकटात जर घर मिळत असेल तर तुम्ही काय कराल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या वाढत्या महागाईच्या युगात तुम्हाला कोणी फुकट घर का देईल. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो, हे खरे आहे…
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण जगभरात असे काही देश आहेत जिथे स्थायिक झाल्यास तुम्हाला घरासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही अगदी फुकटात इथे तुम्हाला तुमच्या हक्कच घर मिळेल. एवढंच काय तर तुम्हाला गाडी आणि सरकारी अनुदानही दिले जाईल. चला तर मग ही फायद्याची ऑफर नक्की कोणत्या देशात दिली जाते ते जाणून घेऊयात.
ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अमेरिका
आयुष्यात एकदा तरी अमेरिकेला जाण्याचे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. अमेरिकेतील अलास्का पट्ट्यामध्ये राहण्यासाठी शासनाकडून आर्थिक अनुदान दिले जाते आहे. इथे वास्तव्यास असणाऱ्यांची संख्या फार कमी आहे, त्यामुळे इथे जे कोणी राहत त्यांना शासनाकडून दरवर्षी भारतीय परिमाणानुसार 1.5 लाख रुपये दिले जातात. फक्त यासाठी तुम्ही इथे किमान एक वर्ष राहावं अशी अट आहे.
स्पेन
स्पेनमध्ये एक पोंगा (Ponga) नावाचे गाव आहे, जिथे लोकसंख्या फार कमी आहे. येथील अर्थव्यवस्थेलाचालना देण्यासाठी इथले सरकार इथे वास्तव्य करणाऱ्या लोकांना 1.5 लाख रुपयांचे अनुदान देते. इथे राहत असताना जर कोणाच्या घरात बाळाचा जन्म झाला तर त्याच्यासाठी सरकारकडून 2 लाख रुपये दिले जातात.
ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रीक
ग्रीक आयलंड अँटिकायथेरावर (Antikythera) राहिल्यास तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला 50 हजार रुपये दिले जातात. आश्चर्याची बाब म्हणजे इथे सध्या अवघी 50 लोकंच राहतात. फक्त इथे तीन वर्षे राहण्याची अट आहे.