पिंड दानसाठी गया जी पेक्षा चांगली जागा भारतात नाही. पिंडदानासाठी देशातील अनेक ठिकाणे महत्त्वाची मानली जात असली, तरी यात गयाजीचे महत्त्व अधिक आहे. लोक शांती आणि त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि प्रार्थना करण्यासाठी बिहारमधील गया हे स्थान निवडतात. मात्र पिंडदानासाठी अधिकतर हे ठिकाणच का निवडले जाते तुम्हाला माहिती आहे का?
यामागचे मूळ कारण म्हणजे पुराणात असे लिहिले आहे की, गया येथे जाऊन पिंड दान केले तर पितरांच्या 21 पिढ्यांपासून मुक्ती मिळते. पण त्यामागे एक रंजक गोष्ट आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण गया स्थानाविषयी न ऐकलेल्या काही रंजक गोष्टींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
हेदेखील वाचा – हायवेवर गाडी चालवताना पेट्रोल संपलं की फ्रीमध्ये मिळते ‘ही’ सर्व्हिस, कुणालाही माहिती नाही ही गोष्ट
गया धामची कथा गयासुर नावाच्या राक्षसाशी संबंधित आहे. ज्याने तपश्चर्या करून भगवान विष्णूंना प्रसन्न केले. आपली तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्याने भगवंताकडे वरदान मागितले की “माझे शरीर देवांपेक्षा पवित्र झाले पाहिजे. “जो कोणी माझ्या शरीराला पाहतो किंवा स्पर्श करतो तो पापापासून मुक्त होतो.” भगवान विष्णूंनी गयासुरला हे वरदान दिले. यानंतर परिस्थिती बदलली. लोक पाप करू लागले आणि त्या बदल्यात गयासुराचे दर्शन घ्यायचे. अशा स्थितीत येथे पाप वाढले.
जेव्हा देवांना याचा त्रास होऊ लागला तेव्हा ते विष्णुजींजवळ गेले. भगवान विष्णू गयासुराकडे आले आणि म्हणाले “मला यज्ञ करण्यासाठी पृथ्वीवरील सर्वात पवित्र स्थान हवे आहे. गयासूर म्हणाले की, देवापेक्षा पवित्र दुसरे काहीही नाही. मी जमिनीवर झोपतो, तू यज्ञ कर.” गयासूर झोपल्यावर त्याचे शरीर 5 कोसपर्यंत विस्तारले.
हेदेखील वाचा – प्रभू रामाने जिथे केले दशरथांचे पिंडदान! भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत श्राद्ध-पिंड दानासाठी प्रसिद्ध, इथे पूर्वजांना मिळतो मोक्ष
विष्णुजींनी यज्ञ सुरू केला आणि त्या यज्ञाच्या प्रभावामुळे गयासुरचे शरीर थरथरू लागले. तेव्हा भगवान विष्णूंनी तिथे एक दगड ठेवला. ज्याला प्रेतशिला वेदी असे नाव दिले गेले. गयासुरच्या बलिदानाने प्रभावित होऊन विष्णूजींनी गयाला वरदान दिले की जो कोणी येथे येऊन आपल्या पूर्वजांना पिंडदान अर्पण करेल, त्याच्या पूर्वजांच्या 21 पिढ्यांची मुक्तता होईल.
गयामध्ये पिंडदानासाठी अनेक पवित्र स्थाने आहेत. फाल्गुन नदी, विष्णुपद मंदिर, अक्षयवट वृक्ष, सीता कुंड, रामशिला वेडी, धर्मरण्य वेदी, प्रीतशिला वेडी, कागबली वेडी यासारख्या ठिकाणी तुम्ही पितरांना तर्पण अर्पण करू शकता आणि त्यांचे पिंडदान करू शकता. याचबरोबर, तुम्ही येथे काही प्रसिद्ध ठिकाणांना भेट देखील देऊ शकता. तुम्ही गयाजीला येत असाल तर तुम्ही महाबोधी मंदिर, रॉयल भूतान मठ, डुंगेश्वरी गुंफा मंदिर, मंगला गौरी मंदिर, सुजाता स्तूप, दुख हरणी मंदिर या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता.