VIDEO | अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश करणार्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.
कोरोनाच्या संकटातून पूर्वपदावर महाराष्ट्राला आणले आहे. तरीही लोकांनी मास्क लावून काळजी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रदेश कार्यालयात केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र पुढे नेण्याचे काम पवारसाहेब करत आहेत असेही अजित पवार म्हणाले.