Rajnath Singh (Photo Credit- X)
Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून जबर मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानचा बडबडेपणा कमी झाला नाहीये. अलीकडेच पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पाकिस्तानला डंपर ट्रक आणि भारताला चमकणारी मर्सिडीज सांगत उलट-सुलट वक्तव्यं केली होती. आता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आसिम मुनीर यांच्या या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, “नुकतेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर त्यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानसह जगभरात ट्रोल झाले. सर्वांनी हेच म्हटलं की, जर दोन देश एकाच वेळी स्वतंत्र झाले आणि एका देशाने कठोर मेहनत, योग्य धोरणं आणि दूरदृष्टीने फेरारीसारखी अर्थव्यवस्था निर्माण केली, आणि दुसरा देश अजूनही खडी भरलेल्या डंपरच्या अवस्थेत असेल, तर हे त्यांच्या स्वतःच्या अपयशाचे लक्षण आहे. मी आसिम मुनीर यांच्या या वक्तव्याकडे एक कबुली म्हणून पाहतो.”
#WATCH | Delhi: Defence Minister Rajnath Singh says, “I would like to draw your attention to the statement given recently by Pakistan’s Army Chief General Asim Munir. He said, “India is a shining Mercedes coming on the highway like a Ferrari, but we are a dump truck full of… pic.twitter.com/VOqQ9BNee0
— ANI (@ANI) August 22, 2025
राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी, नकळतपणे लुटारू वृत्तीकडे लक्ष वेधले आहे, ज्याचा पाकिस्तान जन्मापासूनच बळी ठरला आहे. मला असं वाटतं की, मित्रांनो, आपल्याला पाकिस्तानी सैन्याचा हा भ्रम दूर करावा लागेल. ऑपरेशन सिंदूरमुळे तर त्यांच्या मनात हा भ्रम निर्माण व्हायला नको होता. पण आपल्याला हे सुनिश्चित करावं लागेल की भारताची समृद्धी, आपली संस्कृती आणि आपली आर्थिक भरभराट यासोबतच आपली संरक्षण क्षमता आणि आपल्या राष्ट्रीय सन्मानासाठी लढण्याची भावनाही तेवढीच मजबूत राहिली पाहिजे. आपल्याला हे सुनिश्चित करावं लागेल की, आपल्या सभ्यतेत, आपल्या राष्ट्रामध्ये ती लढाऊ वृत्ती कायम जिवंत राहील.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणतात, “आपण हे देखील मान्य केले पाहिजे की समकालीन जागतिक व्यवस्थेने काही देशांना अभूतपूर्व समृद्धी दिली आहे, तर जगाच्या लोकसंख्येच्या मोठ्या भागाला केवळ असमानता, असुरक्षितता आणि अनिश्चितता दिली आहे… अशा परिस्थितीत, आपण एक नवीन नियमांवर आधारित जागतिक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. एक अशी जागतिक व्यवस्था जिथे समानता असेल. सर्वांना समान संधी. संघर्षांऐवजी सहकार्य. स्पर्धेऐवजी सहकार्य. माझा असा विश्वास आहे की अशी जागतिक व्यवस्था केवळ भारताच्या नेतृत्वाखालीच निर्माण होऊ शकते…”