उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे पुणे येथील एका जमीन खरेदी प्रकरणावरून टीकेचे धनी ठरले आहेत. या गंभीर प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी यावर संस्कारांवर बोट ठेवले आहे.अण्णा हजारे म्हणाले, मंत्र्यांच्या मुलांनी असे वागणे हे दुर्दैव आहे. यात मंत्र्यांचा दोष आहे. कुटुंबाचे, गावाचे संस्कार महत्त्वाचे असतात. त्यांनी युवा पिढीला मोलाचा सल्ला दिला की, हे जीवन केवळ चैनबाजी करण्यासाठी मिळालेले नाही. ‘मी जन्माला का आलो? माझे कर्तव्य काय आहे?’ याचा विचार त्यांनी केला पाहिजे.अण्णांनी या संपूर्ण प्रकरणाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ कारवाई करून चालणार नाही, तर सरकारने यावर ठोस धोरण आखून अशा प्रवृत्तींना कडक शासन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या या जेष्ठ समाजसेवकाच्या वक्तव्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.