दोन दिवसांपूर्वी देशाचा जो अर्थसंकल्प सादर झाला ते केवळ केंद्राची सत्ता वाचवण्यासाठी सादर केल्याचे दिसते आहे. या अर्थसंकल्पातून फक्त दोन राज्यांनाच झुकते माप दिल्याचे सर्वश्रुत आहे महाराष्ट्र हा सर्वाधिक महसूल देणारा राज्य असले तरी त्या बदल्यात महाराष्ट्राला केंद्राकडून कमी निधी देत आले आहे. राजकारणाकरिता सत्ता टिकवण्यासाठी अर्थसंकल्पाचा वापर करणे हे दुर्दैव अशी टीका यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर केली. राज्याचे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी नवराष्ट्र डिजिटल ला Exclusive मुलाखत दिली. सुहास देशपांडे, ब्युरो चीफ, अहमदनगर कार्यालय आणि गिरीश रासकर, डिजिटल प्रतिनिधी यांनी ही मुलाखत घेतली असून यावेळी त्यांनी देशाच्या राजकारणासह राज्य तसेच जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मते मांडली यासोबतच त्यांनी मराठा आरक्षण, कांदा निर्यात बंदी, दूध दरवाढ यावरदेखील आपली स्पष्ट मते मांडली.