अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सूरज चव्हाण यांना पदोन्नती मिळाली आहे (फोटो - एक्स)
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये सूरज चव्हाण यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांना त्यांच्या पक्षातील युवक प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आले होते. सूरज चव्हाण यांनी हाणामारी केल्यामुळे त्यांच्यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र महिन्याभरातच अजित पवार आपला निर्णय मागे घेत सूरज चव्हाण यांना पदौन्नती दिली आहे.
अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी विधीमंडळामध्ये जंगली रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरुन माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात होती. यासाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली. मात्र यावेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्तेफेक केली. यामुळे आक्रमक झालेल्या सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. सूरज चव्हाण यांच्या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर एका महिन्याभरातच सूरज चव्हाण यांचे पक्षामध्ये पुर्नागम झाले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सूरज चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. सूरज चव्हाण यांना नवीन जबाबदारी देण्यात आली असून ते आता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असणार आहे. यावरुन आता जोरदार राजकीय टीका केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावरुन आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!” अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं?
अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा… pic.twitter.com/hC1ekCL28W
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 14, 2025